पिंपरी : गृहकलह मिटल्याने चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आता पक्षातील नाराज नगरसेवकांची समजूत काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शंकर जगताप हे एकदा नगरसेवक होते. आम्ही तीनवेळा नगरसेवक असल्याचे सांगत उमेदवारीला विरोध करणाऱ्या या नाराज नगरसेवकांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>> मतदार संघाची पुनर्रचना आणि यशाची हमी

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
BJP leader Navneet Rana launched open campaign against mahayuti in Daryapur heating up atmosphere
कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,
north nagpur
ध्रुवीकरणाशिवाय उत्तर नागपुरात भाजपला यश मिळवणे अशक्य? मतविभाजन काँग्रेसला रोखणार का?
maharashtra assembly election 2024 mim imtiaz ialil vs bjp atul save aurangabad east assembly constituency
लक्षवेधी लढत : एक है तो सेफ है’ विरोधात ‘इत्तेहाद’!
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत

चिंचवड विधानसभा मतदारसंघ निर्मितीपासून जगताप कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवडमधून लक्ष्मण जगताप एकदा अपक्ष आणि दोनदा कमळावर असे तीन वेळा निवडून आले होते. जानेवारी २०२३ मध्ये त्यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या. पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून अश्विनी आणि दीर शंकर यांच्यातील संघर्षाने गृहकलह चव्हाट्यावर आला हाेता. उमेदवारी नाकारल्याने शंकर जगताप यांच्याकडे भाजप शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली.

हेही वाचा >>> मावळ विधानसभा: “भाजपने आमच्यात लुडबुड करू नये…”, आमदार सुनील शेळकेंनी भाजपला सुनावले

आमदारकी, शहराध्यक्षपद जगताप कुटुंबात, आता पुन्हा जगताप कुटुंबात उमेदवारी कशासाठी? शंकर जगताप हे केवळ एकवेळा नगरसेवक राहिलेत. आमच्या तीन-तीन टर्म झाल्या आहेत. केवळ दिवंगत आमदारांचा भाऊ म्हणून उमेदवारी देणे योग्य नाही, अशी भूमिका घेत १५ माजी नगरसेवकांनी शंकर जगताप यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. परंतु, पक्षश्रेष्ठींनी शंकर जगताप यांच्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली.

पक्षांतर्गत स्पर्धक नसल्याने आमदार महेश लांडगे यांना भोसरीतून सलग दुसऱ्यावेळी उमेदवारी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षांतील कामाचा विचार करून मला उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. शहराच्या शाश्वत विकासाची भूमिका घेऊन मी जनतेसमोर जाणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठी, माझ्या उमेदवारीची पक्षाकडे शिफारस करणाऱ्या सर्व माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. इच्छुकांची नाराजी दूर होईल, असा विश्वास भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.