पुणे : “आज माझ्यासोबत मतदान करताना साहेब नाहीत. दरवेळी आम्ही दोघे मतदान करण्यासाठी घराबाहेर पडायचो”, असे सांगत भाजपाच्या चिंचवडच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. “मी एक लाख मतांनी निवडून येईल”, असा विश्वासदेखील अश्विनी यांनी व्यक्त केला. त्या लोकसत्ता ऑनलाइनशी बोलत होत्या.
हेही वाचा – Loksatta Pune Vardhapan Din 2023 : डिजिटल पुणे २०२५
हेही वाचा – Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणेरी सांस्कृतिकपण
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान करण्यासाठी भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यादेखील कुटुंबासह घराबाहेर पडल्या. यावेळी त्यांनी दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, दरवेळी मी आणि साहेब (दिवंगत लक्ष्मण जगताप) घराबाहेर पडून मतदान करायचो. यावेळी माझ्याबरोबर साहेब नाहीत. पण जनता माझ्या पाठीशी आहे. एका डोळ्यात सुख आणि दुसऱ्या डोळ्यात दुःख आहे. साहेबांच्या पाठीशी जसे नागरिक होते, तसेच माझ्या पाठीशी आहेत. साहेब गेल्यानंतर अवघ्या २० दिवसांमध्ये ही निवडणूक लागली. ते अचानक निघून गेल्याने नागरिकांमध्ये हळहळ आहे. त्यामुळे माझ्यासोबत सहानुभूती असणं साहजिकच आहे. पुढे त्या म्हणाल्या की, माझा एक लाख मतांनी विजय होईल.