राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानिमित्त शहर भाजपकडून शनिवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, सायंकाळीही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ग्रामदैवत कसबा गणपती मंदिराजवळ एकत्र येऊन जल्लोष केला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांच्या महाविकास आघाडीला धक्का देत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळविले आहे. या विजयामुळे १६९ संख्याबळ असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर १०६ जागा असलेला भाजप वरचढ ठरला, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या विजयानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार होणार असून कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात हा कार्यक्रम होईल. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापैर मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीत जोशी यावेळी उपस्थित राहणार आहेत.