चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आता काही दिवसच शिल्लक असल्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रचारात जोर चढू लागला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथे एका बैठकीत बोलत असताना अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. “२६ तारखेला इतक्या जोरात ईव्हीएमचे बटण दाबा की असा ४४० व्होल्टचा करंट लागला पाहीजे. पुन्हा अजित पवारांनी चिचंवडचे नाव घेतले नाही पाहीजे, याची काळजी तुम्ही घ्या.”, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. त्यामुळे अजित पवार यावर आता काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिवसभर दौरा केला. सकाळपासून सुरु झालेले बैठकांचे सत्र रात्री उशीरापर्यंत सुरु होते. यावेळी रात्री उशीरा झालेल्या एका बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. रविवारी, २६ फेब्रुवारी रोजी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात मतदान होणार असल्यामुळे सर्व पक्षांना हा शेवटचा आठवडा प्रचारासाठी मिळणार आहे. त्यामध्ये सर्वच पक्षांनी आरोप-प्रत्यारोपाची फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अश्विनी जगताप यांच्या विरोधात जे निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या विरोधात अश्विनीताई यांच्यासमोरचे बटण इतक्या जोरात दाबा की, ४४० व्होल्ट करंट लागला पाहीजे. असा करंट लागला पाहीजे की, अजित पवारांनी पुन्हा चिंचवडचे नाव काढले नाही पाहीजे. हा करंट देण्याची ताकद या व्यासपीठावर बसलेल्या लोकांची आहे. ही करंट देण्याची ताकद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. हा करंट का दिला पाहीजे? कारण लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या आमदाराचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी निवडणुकीसाठी उभ्या आहेत. अशावेळी त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणाऱ्यांना हृदय आहे की नाही, माणुसकी आहे की नाही? खरंतर असा लोकांना जागा दाखविण्याची गरज आहे.”

Story img Loader