’जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांची ३३८ व्या आषाढी वारी

जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पालखीचे सारथ्य केले.पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी आज शहरात दाखल झाले आहेत. ज्ञानोबा माऊली तुकाराम…च्या गजराने अवघी उद्योगनगरी दुमदुमून निघाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पार्टी आणि आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी खाऊ वाटप, छत्री वाटप, पाणी बॉटल वाटप, रेनकोट वाटप यासह प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी आमदार उमा खापरे, माजी महापौर राहुल जाधव, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे माजी सभापती नितीन लांडगे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, तुकोबारायांच्या पाखलीचे सारथ्य करण्याचे भाग्य लाभले. भारतीय जनता पार्टी आणि तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. सर्व भेद बाजूला सारुन हरीचे नाम प्रेमाने उच्चारावे हीच खरी हरीची सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हा देव केवळ भक्तीभावानेच संतुष्ट होतो म्हणजे हरीनाम घोष चालू आहे तेथेच हा हरी राहात असतो.” याची अनुभूती आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp city president and mla mahesh landge led the palanquin of jagadguru tukoba kjp 91 amy