पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवणुकीबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाही. मात्र खासदारकीचे तिकीट मिळण्यासाठी भारतीय जनता पक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसून येत असून भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भावी खासदार म्हणून फलकबाजी सुरू झाली आहे.

हेही वाचा… पुणे : मेट्रो मार्गिकांलगत रेडीरेकनरचे उच्चांकी दर

गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या जागेसाठी शहरातील भाजप नेत्यांमध्ये मोठी स्पर्धा आहेत. त्यासाठी काही नावांची चर्चा आहे. त्यात शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ आदींचा त्यात समावेश आहे. २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी जवळपास एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार का या बाबत स्पष्टता नाही. मात्र पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपमधून खासदारकी मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. या चढाओढीतूनच जगदीश मुळीक यांच्या नावाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.

Story img Loader