लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: गेल्या काही दिवसांपासून देशभर चर्चेत असलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

लव्ह जिहाद या विषयावर बेतलेल्या द केरळ स्टोरी या चित्रपटावरून देशभरात चर्चा आहे. भाजपकडून या चित्रपटाचा प्रचार केला जात आहे, तसेच भाजप नेत्यांकडून या चित्रपटाचे खेळ प्रेक्षकांसाठी विनामूल्य आयोजित केले जात आहेत.

हेही वाचा… पुणे: मोबाइल पाहण्यावरून वडिलांनी खडसावले, बारावीतील मुलीने केली आत्महत्या

या पार्श्वभूमीवर मुळीक म्हणाले, ‘केरळ स्टोरी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून वास्तव दाखविणारा आहे. केरळमधील ३२ हजार मुली अचानक गायब झाल्या. त्यानंतर त्यांचे धर्मांतर करून ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत सामील केले गेले, असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या विषयाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केल्यास तो अधिकाधिक नागरिकांना पाहाता येईल.’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp city president jagdish muliks demand to make the kerala story tax free in the state pune print news apk 13 dvr