पिंपरी : शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुती सरकारमधील भाजपाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत १२८ पैकी १२५ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता असून तीनही पक्ष स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये नगरसेवकांची संख्या १२८ आहे. शहरात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची राजकीय ताकद आहे. भाजपाचे तीन आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. २०१७ च्या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाजपाची एकहाती सत्ता आणताना अजित पवार यांच्या ताब्यातून महापालिका खेचून घेतली होती.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – पुणे : राज्य राखीव पोलीस दलाच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार; चौघांना अटक

मागील महापालिकेमध्ये भाजपाचे ७७ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४ नगरसेवक होते. आता अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत आहेत. महापालिकेतील सत्ता खेचून घेण्यासाठी पवार हे प्रयत्नशील आहेत. तर, भाजपा पुन्हा महापालिकेत सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

भाजपाने पूर्वी शंभर जागा निवडून आणण्याचा निर्धार केला होता. आता नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी १२८ पैकी १२५ जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. भाजपाने १२५ जागा जिंकण्याचा निर्धार केल्याने केवळ तीन जागा शिल्लक राहतात. त्यामुळे भाजपा महापालिका निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे अजित पवार गटानेही शंभर जागा निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. सत्तेत सहभागी झाल्यापासून पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तर, शिंदे गटामध्ये शांतता असून खासदार श्रीरंग बारणे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

हेही वाचा – निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावर अपघात झाल्यास ठेकेदार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; अधिवेशनात सुनील शेळकेंची मागणी

पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचा विशाल वटवृक्ष तयार झाला आहे. शहराध्यक्षपदाच्या काळात पक्षाचा हा वटवृक्ष जोपासण्यासाठी आणि कायम फुलत ठेवण्यासाठी सचोटीने आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहणार असून महापालिकेत भाजपाचे १२५ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार आहे. – शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा

महापालिकेत १२८ जागा आहेत. भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मित्रपक्षांसह १२५ जागा निवडून येतील, असे म्हटले आहे. युतीमध्ये समन्वय आहे. – अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

Story img Loader