पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी पोटनिवडणूक होणार की नाही, याबाबत पक्षांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. लोकसभेची मुदत संपण्यास दोन महिन्यांचा कालावधी राहिल्याने त्यादृष्टीनेही पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरात लवकर निर्णय घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणूक आयोगाने दहा महिन्यांत काहीच का केले नाही, असे स्पष्ट करत मतदारसंघ एवढे दिवस रिक्त ठेवणे योग्य नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, लोकसभेसाठी कमी कालावधी राहिला असल्याने राजकीय पक्षांनीही सावध भूमिका घेतली आहे.

controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी

हेही वाचा >>> पुणे लोकसभा पोटनिवडणूक; जिल्हाधिकारी तातडीने दिल्लीला रवाना

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत कायम झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असताना हा मतदारसंघ काँग्रेसकडे तर भाजप-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ कायम भाजपने लढविला आहे. त्यामुळे पोटनिवडणूक झाली तर, जागावाटपाच्या सूत्रानुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपमध्ये तिढा

भाजपकडून प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक, माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे तिघे भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत. या तिघांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे. यातील देवधर यांनी विविध आघाड्यांवर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर मुळीक आणि मोहोळ यांच्यातही स्पर्धा सुरू झाली आहे. निवडणूक लढविण्यासंदर्भात या तिघांकडून कोणताही अधिकृत दावा करण्यात आलेला नाही.

काँग्रेसमध्ये गटतट

काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीवरून गटातटाचे राजकारण आहे. काँग्रेसचे माजी आमदार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी यापूर्वीच निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि आमदार धंगेकर यांच्यात सुप्त स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेसनेही सावध भूमिका घेतली आहे. प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड आणि माजी आमदार अनंत गाडगीळ यांनीही तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा >>> पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजी नगर परिसरात कारवाई

मनेसकडून कोण ?

पुणे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेने लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे सातत्याने बैठका घेत आहेत. मनसेचे नेते वसंत मोरे यांनी निवडणूक लढविण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. तर शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

पोटनिवडणूक कधी घ्यायची याचा अधिकार आयोगाचा आहे. या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली जाते का, हे पहावे लागेल. मात्र पोटनिवडणुकीसाठी पक्ष सज्ज आहे.

– धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप

निवडणूक आयोग पोटनिवडणूक घेईल, याबाबत शंका आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तर काँग्रेस तयार आहे. कसबा पोटनिवडणुकीप्रमाणे येथेही चमत्कार होईल. अरविंद शिंदे, प्रभारी शहराध्यक्ष, काँग्रेस

Story img Loader