अजून आठवते.. – सुहास कुलकर्णी

सुहास कुलकर्णी यांनी तीन वेळा नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केले आहे.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Jitendra Awhad vs Dhananjay Munde
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा

प्रभाग पद्धतीतून निवडणूक लढविताना प्रचारासाठी शनिवार पेठेत चार मजले चढून एका घरामध्ये गेलो होतो. त्या भागातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी होत असतानाही त्या कुटुंबाचा पाण्याचा प्रश्न सुटला नव्हता. म्हणून त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्या घरातील सर्वाना मी कसबा गणपती मंडळाचा कार्यकर्ता असून त्या परिसरात केलेली कामे सांगितली. तेव्हा त्यांनी मतदानाचा निर्णय मागे घेताना आम्ही भाजपच्याच चारही उमेदवारांना मतदान करू असे आश्वासन दिले. कार्यकर्त्यांनीच माझ्यासाठी भाजी-पोळी आणली होती. तीनदा नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर मी पुन्हा महापालिका निवडणूक लढविणार नाही, असा निर्णय घेतला होता. त्यानंतर मला अनेकदा आग्रह झाला असला तरी मी या निर्णयावर ठाम आहे.

खासदार अण्णा जोशी आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असलेले गिरीश बापट यांनी १९९२ मध्ये महापालिका निवडणुकीसाठी माझी उमेदवारी जाहीर केली होती. त्या वेळी भगवान देशपांडे हे विद्यमान नगरसेवक होते. पक्षाच्या कार्ड कमिटी बैठकीत या माझ्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा झाली. डॉ. अरिवद लेले आणि बिंदूमाधव जोशी यांनी सूर्यकांत पाठक यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला. मात्र, सुहास कुलकर्णी या कार्यकर्त्यांला उमेदवारी मिळणार नसेल तर आम्ही राजीनामा देतो, अशी भूमिका अण्णा जोशी आणि बापट यांनी घेतली. अखेर चार दिवसांनंतर पाठक यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि माझी उमेदवारी निश्चित झाली.

त्या निवडणुकीमध्ये संघाचे आणि भाजपचे कार्यकर्ते भगवान देशपांडे यांच्या समर्थनार्थ प्रचार करीत होते. मात्र, संघाचे पदाधिकारी दादा पारखी आणि रिसवडकर सर यांच्यासह कसब्यातील दुग्धव्यवसायिक आणि त्यांच्याकडे दूधाचा रतीब टाकणारी मुले यांनी माझा जोरदार प्रचार केला. अखेर साडेतीनशे मतांनी माझा विजय झाला. मला १४५० तर, भगवान देशपांडे यांना ११०० मते मिळाली. काँग्रेसचे रवींद्र खडके तिसऱ्या क्रमांकावर होते. १९९७ च्या निवडणुकीमध्ये मला वॉर्डच नव्हता. कसब्यातील विद्यमान नगरसेवक डॉ. विठ्ठल नेऊरगावकर यांनी एका प्रक्रियेत पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून काँग्रेसला मतदान केले होते. त्यामुळे पक्षाने त्यांना डावलून तेथून माझी उमेदवारी जाहीर केली. अन्यथा एकदा नगरसेवक झाल्यानंतर मी पुन्हा व्यवसायामध्येच परतलो असतो. भाजप कार्यकर्त्यांनी माझा जोरदार प्रचार केल्याने मी साडेसहाशे मतांनी विजयी झालो.

तिसऱ्या निवडणुकीच्या वेळी माझी इच्छा नव्हती. मात्र, प्रभाग पद्धतीमध्ये अन्य उमेदवार नवखे असल्याने त्यांना निवडून आणण्यासाठी तरी निवडणूक लढवावीच लागेल, असा आदेश गिरीश बापट यांनी दिला. तेव्हा मात्र, माझा नाइलाज झाला. हुतात्मा बाबूगेनू मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे हे काँग्रेसचे तगडे उमेदवार असतानाही पाच हजारांच्या मताधिक्याने माझा विजय झाला. चारही उमेदवार भाजपचेच निवडून आले. विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सदस्य आणि शहर सुधारणा समितीवर दोनदा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

शब्दांकन – विद्याधर कुलकर्णी

Story img Loader