लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भारतीय जनता पक्षाने पुण्यातील दोघांना संधी दिली आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत पर्वती विधानसभा मतदारसंघातून चार वेळा विजयी झालेल्या माधुरी मिसाळ यांना प्रथमच संधी मिळाली आहे. पाटील यांच्याकडे तर मिसाळ यांच्याकडे राज्यमंत्रीपद आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या बरोबर इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांना राज्यमंत्री पद देण्यात आले आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात पुणे, पिंपरी- चिंचवडसह ग्रामीण भागातून कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता होती. मंत्रिमंडळात अजित पवार यांचे स्थान पक्के होते. मात्र माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा संधी मिळणार का, याची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांना स्थान देतानाच सलग चार वेळा आमदार असलेल्या माधुरी मिसाळ यांना संधी दिली. यापूर्वीही अनेक वेळा मिसाळ यांच्या नावाची सातत्याने चर्चा होत होती. मंत्रिमंडळामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे, दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या नावाची चर्चा होती. तसेच खडकवासला मतदारसंघातून चार वेळा विजयी झालेले भीमराव तापकीर यांनाही संधी मिळालेली नाही.

आणखी वाचा-स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; प्रवासी महिलेचे दागिने चोरीला

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांनी इंदापूरचेआमदार दत्ता भरणे यांना संधी दिली आहे. त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद असण्याची शक्यता आहे. सन २०१९ च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळतही भरणे राज्यमंत्री होते. तसेच ते सोलापूरचे पालकमंत्रीही होते.

Story img Loader