पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस सोमवारी (१५ मे) पुणे दाैऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या घर चलो संपर्क अभियानाचा प्रारंभही फडणवीस यांच्या उपस्थितीत  करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडी येथील योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ही योजना ७० कोटी रुपयांची आहे. सायंकाळी सहा वाजता बालेवाडी येथील हाय स्ट्रीट मैदानावर कार्यक्रम होणार आहे. तसेच कर्वेनगर-सनसिटी येथे ३७ कोटी रुपये खर्च करून मुठा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे भूमीपूजनही फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनासह भाजपच्या घर चलो संपर्क अभियानाचा प्रारंभही फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.