खूप आमदार-खासदार झाले आहेत. मात्र, तुमची रखडलेली कामे कोण करतो, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. काम झाल्यावर श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतील. मात्र, भाजप सरकारकडूनच ही कामे मार्गी लागत आहेत आणि यापुढेही होत राहतील, असे भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बोपखेल आणि पिंपळे सौदागर येथील लष्करी हद्दीतील रस्त्यांचे प्रश्न संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या माध्यमातून मार्गस्थ केल्याबद्दल खासदार अमर साबळे यांचा दोन्ही ठिकाणी सत्कार करण्यात आला. तेव्हा पिंपळे सौदागर येथील कार्यक्रमात जगताप बोलत होते. नगरसेवक शत्रुघ्न काटे, संजय काटे, जयनाथ काटे, राजू घुले आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, खासदार साबळे यांच्या माध्यमातून हे दोन्ही प्रश्न मार्गी लागले आहेत. जनतेने भाजपला यापुढेही सहकार्य करावे. साबळे म्हणाले, नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. प्रलंबित प्रश्न सोडवू, ती आमची जबाबदारी आहे.

Story img Loader