पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत मोहोळ यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळेल, अशी पहिल्यापासूनच चर्चा होती. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रचारक सुनील देवधर आणि माजी आमदार, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नावेही चर्चेत आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय अशी मोहोळ यांची पक्षात ओळख आहे. अन्य पक्षातील नेत्यांबरोबरही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे मोहोळ यांनाच उमेदवारी मिळण्याचा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होते. त्यानुसार बुधवारी मोहोळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाल्यावर मुरलीधर मोहोळ यांनी आनंद व्यक्त केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader