बोपोडी चौकात वर्षांनुवर्षे वाहतूक कोंडी; मंगल कार्यालयांमुळे वाहतुकीचे तीन तेरा
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर भाजपच्या वतीने गुरुवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. बोपोडी चौकात वर्षांनुवर्षे वाहतुकीचा खोळंबा होत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. मंगल कार्यालयांमुळे जागोजागी वाहतुकीचे तीन तेरा वाजतात, त्यावर कारवाई होत नाही, असे अनेद मुद्दे भाजपने या निमित्ताने उपस्थित केले आहेत.
िपपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपचे माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्यासह माउली थोरात, संजय मंगोडेकर, केशव घोळवे, बाबू नायर, अजय पाताडे, विजय सिनकर, अनूप मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. हॅरिस ब्रीज ओलांडल्यानंतर बोपोडीत कायम वाहतुकीचा खोळंबा होतो. वर्षांनुवर्षे ही समस्या नागरिकांना भेडसावते, मात्र त्यावर अद्याप उपाययोजना होत नाही. भोसरी, आळंदी, वाकड, िहजवडी, जगताप डेअरी, रहाटणींमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. नागरिक तासन्तास अडकून पडतात, वाहतूक सुरळीत राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना वाहतूक पोलिसांकडून केल्या जात नाही. शहरातील वाहतूक सुरळीत करावी, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे. रस्त्यांच्या सुविधा नाही, वाहतुकीचे प्रश्न वाढले आहेत. महापालिका सहकार्य करत नाही. . नगरसेवकांनी रस्त्यांच्या कडेला दुकाने थाटल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

 

Story img Loader