लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत रविवारी विजय संकल्प रॅली काढण्यात आली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या आमदारांकडून रॅलीचे नेतृत्व करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत विजय संकल्प रॅलीद्वारे कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी सक्रिय करण्यात येत आहे. कसबा मतदारसंघाच्या वतीने सकाळी साडेदहा वाजता शनिवार पेठेतील नाना नानी पार्क येथून रॅली काढण्यात आली. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांची या वेळी उपस्थिती होती. पर्वती मतदारसंघातील रॅलीमध्ये आमदार माधुरी मिसाळ, महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतून काढण्यात आलेल्या विजय संकल्प रॅलीत आठ हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते, अशी माहिती शहर भाजपकडून देण्यात आली.