पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका, मेळावे सुरू आहेत. उमेदवाराबाबत चाचपणी करण्यात येत आहे. तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने जी नेतेमंडळी महायुतीमध्ये जाऊ इच्छित होती त्यातील बहुतांश नेतेमंडळी महाविकास आघाडीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.

गणेशोत्सवादरम्यान अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गणेश मंडळांना भेट दिली. भाजपाचे नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगावशेरी मतदारसंघातील एका गणेश मंडळात नागरिकांशी संवाद साधत असताना, आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहोत आणि तुतारीकडून (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे आपल्या भागात असलेल्या नातेवाईक, मित्रमंडळ यांना सांगा की, तुतारीला मतदान करावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर बापूसाहेब पठारे नेमके कधी शरद पवार गटात प्रवेश करतील या चर्चांना उधाण आले होते.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Stone pelting at Narsayya Adam house in Solapur
सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक; आघाडीतील वादाला हिंसक वळण, काँग्रेसवर कारवाईची मागणी

हेही वाचा – Ganpati Visrajan : गर्दी आणि उन्हामुळे विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना त्रास; पहिल्या चार तासांत १२२ जणांवर उपचार

हेही वाचा – “तुला आंदेकरच्या ऑफिसला नेऊन दाखवते मी कोण आहे ते”, महिला पोलिसांना विक्रेत्या महिलेने दिली धमकी

आज अनंत चतुर्दशीला मुहूर्त गाठत भाजपाचे नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी थेट मुंबई गाठून शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे, माजी नगरसेवक भय्यासाहेब जाधव हे उपस्थित होते. शरद पवार गटात बापूसाहेब पठारे यांनी प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघातून शरद पवार गटातून त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. सद्या या मतदारसंघात महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून अजित पवार गटाला की भाजपाला हा मतदारसंघ सोडला जातो? हे पाहावे लागणार आहे.