पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका, मेळावे सुरू आहेत. उमेदवाराबाबत चाचपणी करण्यात येत आहे. तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने जी नेतेमंडळी महायुतीमध्ये जाऊ इच्छित होती त्यातील बहुतांश नेतेमंडळी महाविकास आघाडीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.
गणेशोत्सवादरम्यान अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गणेश मंडळांना भेट दिली. भाजपाचे नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगावशेरी मतदारसंघातील एका गणेश मंडळात नागरिकांशी संवाद साधत असताना, आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहोत आणि तुतारीकडून (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे आपल्या भागात असलेल्या नातेवाईक, मित्रमंडळ यांना सांगा की, तुतारीला मतदान करावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर बापूसाहेब पठारे नेमके कधी शरद पवार गटात प्रवेश करतील या चर्चांना उधाण आले होते.
आज अनंत चतुर्दशीला मुहूर्त गाठत भाजपाचे नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी थेट मुंबई गाठून शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे, माजी नगरसेवक भय्यासाहेब जाधव हे उपस्थित होते. शरद पवार गटात बापूसाहेब पठारे यांनी प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघातून शरद पवार गटातून त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. सद्या या मतदारसंघात महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून अजित पवार गटाला की भाजपाला हा मतदारसंघ सोडला जातो? हे पाहावे लागणार आहे.