पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका, मेळावे सुरू आहेत. उमेदवाराबाबत चाचपणी करण्यात येत आहे. तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने, जे नेतेमंडळी महायुतीमध्ये जाऊ इच्छित होते त्यातील बहुतांश नेतेमंडळी महाविकास आघाडीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. त्या सर्व घडामोडी दरम्यान कागल येथील भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाडगे यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला. यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात महायुतीमधील तीनही पक्षात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बापूसाहेब पठारे हे २००९ मध्ये पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन आमदार होते आणि सध्या ते भाजपामध्ये कार्यरत आहे. त्यानंतर २०१४ साली भाजपाचे नेते जगदीश मुळीक हे आमदार झाले. त्या निवडणुकीच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे बापूसाहेब पठारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्या भागातील प्राबल्य लक्षात घेऊन २०१९ निवडणुकीत भाजपाकडून बापूसाहेब पठारे यांना संधी मिळेल असे वाटत होते. मात्र विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना भाजप नेतृत्वाने संधी दिली. मात्र त्या निवडणुकीत जगदीश मुळीक यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि २०१९ च्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले.या तीनही निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल पाहता आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहिल्यानंतर भाजपाचे नेते बापूसाहेब पठारे यांनी शरद पवार गटात परतण्याचे संकेत दिले आहे.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Why did industries move out of Hinjewadi ITpark Sharad Pawar told exact reason
हिंजवडी आयटीपार्कमधून उद्योग बाहेर का गेले? शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण, म्हणाले…
sharad pawar road show chinchwad assembly constituency rahul kalate
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद
Sharad Pawar criticize BJP in pune said concentrated power is corrupt
शरद पवार म्हणाले, केंद्रित झालेली सत्ता…
Stone pelting at Narsayya Adam house in Solapur
सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक; आघाडीतील वादाला हिंसक वळण, काँग्रेसवर कारवाईची मागणी

हेही वाचा – पुणे: घोरपडे पेठेतील गुंड जंगल्या सातपुतेचा खुनाचा कट उधळला, एन्जॉय ग्रुपच्या सातजणांना अटक; सात पिस्तुलांसह २३ काडतुसे जप्त

हेही वाचा – पुणे: मद्यधुंद टेम्पो चालकाने सात ते आठ वाहनांना दिली धडक, दोघे जण जखमी

त्याबाबत सांगायचे झाल्यास सध्या गणेशोत्सव सुरू असून अनेक राजकीय पक्षांचे नेतेमंडळी गणेश मंडळांना भेट देत आहेत. त्या प्रमाणेच भाजपाचे नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे वडगावशेरी मतदारसंघातील एका गणेश मंडळात नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहोत आणि तुतारीकडून (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे आपल्या भागात असलेल्या नातेवाईक, मित्रमंडळ यांना सांगा की, तुतारीला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याबाबत बापूसाहेब पठारे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.