शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूर्य, चंद्र आणि धूमकेतू म्हटलं. तसेच भाजपाच्या वॉशिंग मशिनवर बोलावं, अशी मागणी केली. यावर आता भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाही. तुरुंगात जावं लागल्याने त्यांची पातळी घसरली आहे,” अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. ते मंगळवारी (४ एप्रिल) पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाही. तुरुंगात जावं लागल्याने त्यांची पातळी घसरली आहे. हे सामान्य माणसाला आवडत आहे असं नाही. आजही सर्वांनी मोदींना जगातील सर्वात सर्वोच्च नेते म्हणून गौरवलं आहे. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून देश वेगाने प्रगती करत आहे. आपली गंगाजळी म्हणजे परकीय चलन सुधारलं. अनेक देशांनी रुपयात व्यवहार करण्यास मान्यता दिली. या सर्व गोष्टी सर्वसामान्य माणसाला कळतात. ते व्यवस्थित वर्तमानपत्र वाचतात, टीव्ही पाहतात.”

Raj Thackeray
Raj Thackeray : ‘अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना म्हणणारे …’, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
Uddhav Thackray Warns to Independent Candidates to take Back The Name
Uddhav Thackeray : “अपक्ष किंवा बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर…”, उद्धव ठाकरेंचा इशारा
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Mahim Assembly Constituency Sada sarvankar vs Amit Thackeray
Mahim assembly seat: “बाळासाहेबांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती, राज ठाकरेंनी…”, माहीम विधानसभेबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?
Allegations against Amit Shah baseless The Ministry of Foreign Affairs informed the High Commission of Canada
‘अमित शहांवरील आरोप निराधार’; परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या उच्चायुक्तालयाला सुनावले

“मोदींवर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं”

“इंग्लंडला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर गेली. हे जगाला माहिती आहे. अशा माणसावर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्याचा परिणाम सामान्य माणसावर होत नाही. एखादा माणूस कशाचाही परिणाम करून घेत नसेल, तर त्यांनी कितीही शिव्या दिल्या तरी त्याचं समाधान केवळ शिव्या देणाऱ्याला असतं,” असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं.

राऊतांचा फडणवीसांनी भेट न दिल्याचा आरोप, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

चंद्रकांत पाटलांनी फडणवीस भेट देत नाही या राऊतांच्या आरोपांवरही प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. फडणवीस त्यांना उत्तर लिहिण्यास सक्षम आहेत. देवेंद्र फडणवीस कधीही कुणाला भेट देणं टाळत नाहीत. विधिमंडळाचं अधिवेशन मोठा काळ चाललं. इतिहासात पहिल्यांदा इतके दिवस अधिवेशन चाललं. त्यामुळे फडणवीसांनी व्यग्र दिनक्रमात वेळ दिला नसेल.”

हेही वाचा : “या देशात लोकशाहीचा अतिरेक…” संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“राऊतांच्या प्रत्येक आरोपाला गांभीर्याने घ्यायचं नसतं”

“संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला गांभीर्याने घ्यायचं नसतं. तसं झालंही नसेल आणि झालं असेल, तर केवळ देवेंद्र फडणवीस व्यग्र असल्याने झालं असेल. ते राऊतांना वेळ देतील,” असंही चंद्रकांत पाटलांनी नमूद केलं.