पुणे जिल्ह्याला पालकमंत्री नाही असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, जो झोपलेला आहे. त्याला उठवण फार सोपं असत. पण झोपेचं सोंग घेतलय, त्याला उठवण फार कठीण असत, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. भाजपचे नेते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमानिमित्त आले असताना. प्रसार माध्यमांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी यावेळी उत्तर दिले.
तुम्हाला कार्यक्रमांना बोलवल जात नाही. त्यामुळे आमच्या परवानगीशिवाय कार्यक्रम घेऊ नयेत, असा जीआर तुम्ही काढला आहे. त्यावरून अजित पवार यांनी तुमच्यावर टीका केली. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, अजित पवारांना लोकांना हसवणार बोलणं याची सवय आहे. काही पंटर असतात ना, काही बोल की हशा आणि टाळ्या वाजवणारे, स्वतःच्या पालकमंत्री कालवधीमधील अनुभव पाहणे जरुरीचे आहे. अनेक उद्घाटनाचे कार्यक्रम ठरतात. त्यामध्ये भांडण होतात, हा गट म्हणतो मी निधी आणला. तो गट म्हणतो मी निधी आणला. त्यामुळे सगळ्या ठिकाणी पालकमंत्र्यानी जाण्याची अपेक्षा नाही. कोणताही कार्यक्रम ठरल्यानंतर व्यत्यय येऊ नये.त्यामुळे अशी परवानगी घेण्यात चुकीच काय असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित करीत ते पुढे म्हणाले की, आमच्या घरातील पैसे खर्च करून अनेक सामाजिक काम करतोय. दादा,त्यामुळे सार्वजनिक निधी हा सार्वजनिकच आहे. तसेच काही ठिकाणी उद्घाटनावरून भांडण होत असून आदल्या दिवशीच उद्घाटन होत आहे. त्यामुळे सरकारी नोकरांना सूचना देण्यात आल्या आहेत की,अधिकृत कार्यक्रम नसेल तर तुम्ही जाऊ नका अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- ‘मी गुजराती म्हणून गुजरातला प्राधान्य नको’; राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदींना टोमणा
तसेच ते पुढे म्हणाले की, काही वादग्रस्त झाल्याशिवाय ,दुसऱ्याला टपली, मारल्याशिवाय, चिमटा काढल्याशिवाय आणि आम्ही मोठे विषय संपताच नाही. हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानले पाहिजे की,१९९५ निवडणुकीत भाजप- सेना युतीच सरकार आले. तेव्हा राजकीय पार्श्वभूमी नसताना, तो मंत्री होतो.आरएसएस, भाजपाने आजपर्यंत सर्व सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांला ताकद देण्याच काम केले आहे.या गोष्टी यांना पेलवतच नसून मंत्री म्हटल्यावर त्याचे दोन कारखाने पाहिजे.पण माझा एक ही कारखाना नाही.चार सूतगिरण्या,दोन बॅंका, जमीन, कारखान्याला ऊस जायला पाहिजे.आमच तस काही नसल्याने,त्यांना पेलवत नाही.त्यामुळे मलासारखा चिमटा काढण्याचा प्रयत्न करीत असतात.मी ते एन्जॉय करित असल्याच सांगत, अशा शब्दात अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबीयांवर त्यांनी निशाणा साधला.
सध्या राजकीय टीका टिप्पणी होत आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या टॉपरने, राजकीय,सामाजिक अनुभव, प्रतिष्ठा आहे. प्रत्येक पक्षातील एक पण पुन्हा त्यात बाजार करून चालणार नाही.दहा बारा जणांनी एकत्रित बसून, महाराष्ट्र राजकारणवर आचारसंहिता लिहिली पाहिजे.अजित पवार यांना पण ती आचारसंहिता आपोआपच लागू पडेल.तुम्हाला उठसूठ लोकांना टपली मारण्याचा अधिकार दिलेला नाही.लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे.एखाद्या गोष्टीवर किती मोठी प्रतिक्रिया येते. तुम्ही त्याचा अनुभव घेतला आहे.आम्ही कोणाची काळजी करित नाही आणि घाबरत देखील नाही. तुम्ही कोणाला घाबरत नाही तर चार दिवस कुठे लपून बसला होता.त्यामुळे दुसऱ्यावर दगड फेकताना,आपण काचेच्या घरात बसलो आहे. हे लक्षात ठेवल पाहिजे.त्यामुळे एक आचारसंहिता झाली पाहिजे.प्रत्येकाने एकमेकांना आदर दिला पाहिजे.अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.
हेही वाचा- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून टिळक कुटुंबीयांचे सांत्वन
अजित पवार, नितेश राणे, संजय राऊत हे नेते आरोप प्रत्यारोप करताना जो शब्द प्रयोग करीत आहे.त्यावर ते म्हणाले की,यांच्यामध्ये कोण मध्ये पडणार, आमच्याकडे देवेंद्र फडणवीस,बाळासाहेबांच्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार,काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण,मनसेचे राज ठाकरे,वंचितचे प्रकाश आंबेडकर, आरपीआयचे रामदास आठवले या आठ ते दहा जणांनी एकत्रित बसून महाराष्ट्रात काय पाहिजे.काय केले पाहिजे हे ठरविले पाहिजे.संतांची,लेखकांची परंपरा असलेली भूमी आहे.त्यामुळे कोण कोणाला काही बोलत याला काही अर्थ आहे का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडी म्हणून पुढील निवडणुका एकत्रित लढणार आणि अशा प्रकाराचे राज्यपाल आपल्याला पहिल्यांदाच लाभले असे विधान शरद पवार यांनी केले आहे. त्यावर ते म्हणाले की,पवारसाहेब जे म्हणतात, त्याच्यापेक्षा ते वेगळ करतात, अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.