राजकारणात येणा-या व्यक्तीने नगरसेवक, आमदार, खासदार होण्याची महत्त्वकांक्षा ठेवणे चुकीचे नाही. कसब्यातून निवडणूक लढविण्यास अनेक इच्छुक असले तरी, प्रदेश स्तरावरील समिती नाव निश्चित करेल आणि दिल्लीतूनच उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. टिळक कुटुंबीयांपैकी उमेदवार आल्यास निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे घरातील उमेदवार देणार नाही, असे कोणी म्हटलेले नाही. मात्र निर्णय दिल्लीतच होईल, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी उमेदवाराच्या नावाची गुप्तता कायम ठेवली.
या बैठकीनंतर भाजपाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज कसबा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आज आमची ३० ते ३५ शहरातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. आता आम्ही या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार आहे. तसेच मागील निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत अधिक मते कशी मिळतील यावर विशेष लक्ष असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. प्रयत्न सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीतील महान नेत्यांनी निवडणूक होणार असे सूचित केल्याच सांगत अजित पवार यांना त्यांनी टोला लगावला. या निवडणुकीत गाफिल न राहता. निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितले.
यापूर्वी भाजपने बिनविरोध निवडणुका होऊ दिल्या नाहीत.त्यामुळे आता ती अपेक्षा तुम्ही करू नये. असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यावर ते म्हणाले की,आम्ही घरातील उमेदवार देणार नाही, असं कोणी सांगितल? आमच्या पक्षात प्रदेश आणि त्यानंतर दिल्लीत निर्णय घेतले जातात. ज्यांना पार्टीच माहिती नाही. आमची पार्टी लोकशाही मार्गाने चालते. आमचा हा प्रमुख आहे. मात्र व्यवहारात काही दिसत नाही. पण आमची पार्टी पूर्णपणे लोकशाही मार्गाने चालते, अशी भूमिका महाविकास आघाडीवर त्यांनी निशाणा साधला.
तसेच ते पुढे म्हणाले की, राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा निवडणूक बिनविरोध केली. त्यावेळी त्यांच्या पत्नीला संधी दिली नाही. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राजीव सातव यांच्या पत्नीला संधी दिली. ती निवडणूक देखील बिनविरोध झाली, असेही पाटील म्हणाले.
हेही वाचा- कारागृहात पाळणाघर; ऑर्थर रोड कारागृह परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी
संजय राऊत सकाळी काय म्हटले हे पाहण्यासाठी माझ्यासह सर्वच जण उत्सुक असायचे
आजचा कार्यक्रम हा राजकिय अजेंडा म्हणून वापरला जात आहे.अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, जेलमधून बाहेर पडल्यावर संजय राऊत चार दिवस शांत होते. संजय राऊत यांनी सकाळी काय म्हटले हे पाहण्यासाठी माझ्यासह सर्वच जण उत्सुक असायचे.मला त्यांच्यावर बोलायच असायच. आता माझ्यासह सर्वसामान्य माणसाला संजय राऊत कुठे काय बोले हे तुम्ही सांगितल्यावर कळते.काश्मीर मध्ये बोले की येथे बोले आहेत.
पिंपरी चिंचवड येथे २५ तारखेला
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत बैठक केव्हा होणार त्या प्रश्नावर ते म्हणाले की,पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे आज भेटण्यास येणार आहे. २५ तारखेला पिंपरी चिंचवड येथे कार्यक्रमासाठी जाणार आहे. त्यावेळी त्या ठिकाणी तेथील निवडणूक संदर्भात बैठक होईल.