Chandrakant Patil : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं. आता महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गुरुवारी (५ डिसेंबर) हा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडला. मात्र, सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलेलं आहे.

यातच महायुतीत तीन पक्ष असल्यामुळे कोणत्या पक्षाला किती आणि कोणते खाते मिळणार? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. यातच मंत्रि‍पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असं असतानाच आता राज्यातील सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरूनही रस्सीखेच सुरु असल्याची कुजबुज आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी पुण्याच्या पालकमंत्रिपदाबाबत सूचक भाष्य केलं. पुण्याचं पालकमंत्री पद कोणाकडे जाईल? अजित पवार की तुमच्याकडे (भाजपा) असं विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, “माझे वरिष्ठ जे सांगतील ते मी करतो”, अशी सूचक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Sharad Pawar On Mahavikas Aghadi
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Sharad Pawar On Rohit Pawar Rohit Patil
Sharad Pawar : रोहित पवारांना डावलून रोहित पाटील यांना प्रतोद का केलं? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण
Sharad Pawar on Maharashtra assembly Election result
Sharad Pawar: “मी १४ निवडणूक लढलो, कधीही पराभव नाही; पण यावेळी…”, शरद पवारांचं निकालावर मोठं विधान
Amol Mitkari On Rohit Patil
Amol Mitkari : “जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला”, रोहित पाटलांच्या मुख्य प्रतोद निवडीवरून अमोल मिटकरींची खोचक टीका
Jitendra Awad, Rohit Patil and Uttam Jankar
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महत्वाचा निर्णय; जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील आणि उत्तम जानकरांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
Amol Mitkari on Maharashtra Assembly Election 2024
Amol Mitkari : राजकीय हालचालींना वेग; अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेताच अमोल मिटकरीचं सूचक ट्वीट, म्हणाले, “जंगल मे सन्नाटा…”
Rohit Pawar On Ajit Pawar
Rohit Pawar : “अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः…”, मुख्यमंत्रिपदावरून रोहित पवारांचं मोठं विधान

हेही वाचा : अजित पवार निवडणूक निकालांसह शरद पवारांच्या छायेतून कसे बाहेर पडले?

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

आता पुण्याचं पालकमंत्री पद कोणाकडे जाईल? तुमच्याकडे (चंद्रकांत पाटील) की अजित पवारांकडे? असा प्रश्न भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता ते म्हणाले की, “तुम्ही अशा माणसांना प्रश्न विचारता की ज्याला प्रश्नही तोच आणि उत्तरही तेच. माझे वरिष्ठ जे सांगतील ते मी करतो”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं.

भाजपा आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच?

राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता महायुतीच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) पक्षात रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता जेव्हा पालकमंत्रिपद ठरवलं जाईल तेव्हा नेमकं कोणाला हे पद मिळतं? ते स्पष्ट होईल.

Story img Loader