पिंपरी : माजी राज्यमंत्री व भाजप नेते संजय उर्फ बाळा भेगडे यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना सर्वांसमक्ष झापले. तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असून सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप भेगडे यांनी या वेळी केला.मावळ तहसील कार्यालयात नागरिकांची कामे होत नाहीत, दलालांशिवाय प्रवेश मिळत नाही.

नागरिकांंना वेठीस धरले जाते, अशा तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत भेगडे यांनी पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांसमवेत तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार बर्गे यांना भेगडे यांनी सर्वांसमक्ष धारेवर धरले. यासंदर्भात भेगडे म्हणाले,की गेल्या दोन वर्षात तहसील कार्यालयात दलालांनी धुमाकूळ घातला आहे.

हेही वाचा : पुणे : पुरंदर विमानतळाची भूसंपादन अधिसूचना लवकरच; मोबदल्याचे पर्यायही निश्चित होण्याच्या मार्गावर

आता हे कार्यालय सर्वसामान्यांसाठी राहिलेच नाही. तेथे दलालांशिवाय प्रवेश नाही. कार्यालयात ठाण मांडून बसणाऱ्या दलालांना पैसे दिल्याशिवाय कामेच होत नाहीत. नागरिकांना तास न तास ताटळकत बसवून ठेवले जाते. स्वस्त धान्याचा सरळसरळ काळाबाजार केला जातो. अशा प्रकारच्या असंख्य तक्रारी आहेत. या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास प्रशासनाला सरळ करू आणि तहसील कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशाराही भेगडे यांनी दिला.

Story img Loader