तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे शरद पवार यांच्या घरातील होते

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर ५ फेब्रुवारी २०२२  रोजी ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी हल्ला केला होता.ते प्रकरण राज्यभरात चांगलाच गाजल होत.त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले होते.त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर कारवाई होणार कधी या मागणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, माझ्यावर हल्ला करणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या गुंडावर लवकरच कारवाई होणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : “संजय राऊत म्हणत होते, ते हेच दंगे….”, किरीट सोमय्यांचं पुण्यातून टीकास्र

तसेच ते पुढे म्हणाले की,पुणे महापालिकेच्या आवारामध्ये ५ फेब्रुवारी २०२२  रोजी उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी माझ्यावर जीव घेणा हल्ला केला होता.त्या हल्लेखोर आरोपी विरोधात गुन्हा देखील दाखल झाला.पण त्या आरोपी विरोधात तत्कालिन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.मात्र सध्याचे आयुक्त रितेश कुमार यांच्या माध्यमातून तपासला गती प्राप्त झाली असून भविष्यामध्ये माझ्यावर हल्ला करणार्‍या उद्धव ठाकरेंच्या ३३ गुंडावर निश्चित कारवाई होणार असल्याचे संकेत भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले. तसेच तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे शरद पवार यांच्या घरातील होते.अमिताभ गुप्ता यांनीच करोना काळात राजेश वाधवान याला पळवून जाण्यास मदत केली होती आणि त्यांच्याच(तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता)निगराणी खाली माझ्यावर जीव घेणा हल्ला झाल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader kirit somaiya meet pune police commissioner ritesh kumar for action against attackers svk 88 zws
Show comments