पुणे : शरद मोहोळ यांनी कायम हिंदुत्ववादासाठी काम केले. मोहोळ कुटुंबीयांसोबत आम्ही कायम आहोत, असे भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी सांगितले. मोहोळ खून प्रकरणात तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे राणे यांनी नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राणे यांनी सोमवारी मोहोळ कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी पत्नी स्वाती मोहोळ यांचे सांत्वन केले. त्यानंतर ते म्हणाले, “मोहोळ यांनी हिंदुत्वासाठी काम केले. सामान्यांच्या अडचणी सोडवल्या. या कुटुंबियांच्या पाठिशी उभे राहणे, हे आमचे काम आहे.”

हेही वाचा : सराईत गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणानंतर आमदार धंगेकर यांचा आरोप; म्हणाले, “भाजपचा गुंडांना…”

प्रसारमाध्यमांनी मोहोळ यांच्याविषयी चुकीची माहिती छापू नये, असे आवाहनही यावेळी नितेश राणे यांनी केले.

गुंड शरद मोहोळच्या हत्येच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय समोर आलं?

शरद मोहोळ चालत जातो आहे हे दिसतं आहे. त्याच्या आजूबाजूलाही काही माणसं चालत आहेत. अचानक डाव्या बाजूचा माणूस आणि शरद मोहोळच्या मागे असलेला माणूस बंदूक काढून शरद मोहोळवर गोळ्या झाडतात. लगेच त्या गल्लीत एकच धावपळ माजते. तसंच शरद मोहोळ खाली कोसळतो. त्यानंतर हल्लेखोर काहीही कळायच्या आत पळून जातात. त्यानंतर दोन-तीन लोक येतात ते शरद मोहोळला उठवण्याचा प्रयत्न करतात. उचलून उभं करण्याचा प्रयत्न करतात पण शरद मोहोळ पुन्हा कोसळतो. असं सगळं या सीसीटीव्हीत दिसतं आहे.

हेही वाचा : कोण होता शरद मोहोळ? वाचा ‘हिंदू डॉन’ अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरदची रक्तरंजित कहाणी…

गुंड शरद मोहोळ कोण होता?

कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा शरद मोहोळ हा अत्यंत विश्वासू साथीदार होता. जर्मन बेकरी प्रकरणातला आरोपी कातिल सिद्दीकीचा येरवड्यातील अंडासेलमध्ये मोहोळ गँगने पायजम्याच्या नाडीने आवळून खून केला. या खुनात प्रमुख सहभाग होता तो शरद मोहोळचा. शरद मोहोळ या खुनामुळे चर्चेत आला होता. ४ ऑक्टोबर २००६ या दिवशी पौड फाटा भागात संदीप मोहोळला प्रतिस्पर्धी गँगने म्हणजे मारणे गँगने संपवलं. त्यानंतर शरद मोहोळने निलायम चित्रपटगृह परिसात असलेल्या एका उपहारगृहात प्रतिस्पर्धी गणेश मारणे टोळीतील किशोर उर्फ पिंटू मारणेला गोळ्या घालून संपवलं होतं. या प्रकरणात शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेरावला अटक झाली होती. २६ जून २०१६ या दिवशी कातिल सिद्दीकी प्रकरणात शरद मोहोळची सुटका झाली. त्यानंतर शरद मोहोळ विविध राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होत होता. त्याच्या पत्नीने भाजपाचे काम सुतारदारा भागात सुरु केलं होतं. आता याच शरद मोहोळला गोळ्या घालून संपवण्यात आलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla nitesh rane meet family of goon sharad mohol pune print news rbk 25 pbs