पुणे : गेल्या पाच वर्षांपासून पक्ष संघटनेत सातत्याने डावलण्यात आलेले आणि निर्णय प्रक्रियेत जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात आलेले खासदार गिरीश बापट अंथरूणाला खिळले असतानाही त्यांना कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवून भाजप नेते बापट यांच्या जीवाशी खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर, दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप रुग्णशय्येवर असतानाही पक्षनिष्ठेच्या गोंडस नावाखाली ‘सहानुभूती’ मिळविण्याची भाजपची नवी नीतीही यामुळे अधोरेखीत झाली आहे.

त्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत बापट यांची ‘आठवण’ भाजप नेत्यांना झाली आहे. सक्रिय प्रचारात सहभागी होण्यास मर्यादा आहेत, असे बापट यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतरही बापट यांना कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरविण्याची वेळ का आली, याची चर्चा भाजपच्या वर्तुळातही सुरू झाली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न भाजप नेत्यांनी केले. महाविकास आघाडीने मात्र त्याला प्रतिसाद दिला नाही. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीने पोटनिवडणूक ताकदीने लढविण्याचे जाहीर केले.

Many rebels sheathed their swords on last day of withdrawal of nomination papers
‘भाजप’कडून फराळ वाटप नियमात, मात्र संविधान जागर नियमबाह्य.. हा कोणता कायदा?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
bjp leaders diwali milan function chandrapur
भाजप नेत्याच्या ‘दिवाळी मिलन’ सोहळ्याचे जोरगेवार, अहीर यांना निमंत्रण, मुनगंटीवारांना डावलले
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
Jitendra Awad criticism of BJP regarding the murders print politics news
हत्या करणे भाजपच्या डाव्या हाताचा खेळ; जितेंद्र आव्हाड यांची टीका
BJP worker was stoned to death in Pavananagar in Maval
मावळातील पवनानगरमध्ये भाजप कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून
Phadke Road, social media Phadke Road,
समाज माध्यमांतील टीकेमुळे फडके रोडवर ढोलताशा वादनास परवानगी, डीजेच्या दणदणाटाबरोबर ढोलताशांचा कडकडाट
Vijay Wadettiwar statement regarding Congress BJP propaganda Kunbi teli community
“कुणबी, तेलींपासून काँग्रेसला वाचवा, हा भाजपचा अपप्रचार,” विजय वडेट्टीवार म्हणाले…

हेही वाचा >>> “कसब्याचे नागरिक भाजपाला जागा दाखवतील”, रोहित पवारांचा हल्लाबोल; निकालाबाबत म्हणाले, “धंगेकर एक नंबरवर, तर..”

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे ब्राह्मण समाजही काहीसा दुखावला गेला. त्यातच महाविकास आघाडीने तगडा उमेदवार दिल्याने कसबा या पारंपारिक बालेकिल्ल्यात भाजप अडचणीत सापडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू झाली. शिवसेनेत बंड घडवत हस्तगत केलेली केलेली राज्यातील सत्ता यामुळे भाजपविरोधात असलेली नाराजी, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतील पराभव, महाविकास आघाडीची एकत्रित ताकद याचे दृश्य परिणाम कसबा पोटनिवडणुकीतील होतील, अशी भीती भाजप नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे कसब्याचे एकहाती नेतृत्व केलेले आणि कसब्याचा हुकमी एक्का, कसब्यातील सर्व समाज घटकांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या गिरीश बापट यांची आठवण भाजप नेत्यांना झाली. त्यामुळे अंथरूणाला खिळलेले असतानाही त्यांना प्रचारात उतरविण्याची खेळी भाजप नेत्यांनी केली.

हेही वाचा >>> पुणे : काँग्रेसचे उमेदवार मनसे कार्यालयात; आमचा पाठिंबा भाजपालाच, मनसेने स्पष्ट केली भूमिका

महापालिकेत भाजप नेत्यांना बापट यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळाली. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुण्यातील राजकारणात उदय झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मर्जीतील असलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य सर्वच वरिष्ठ नेत्यांनी बळ दिले. शहराचे नेतृत्व बापट की पाटील यांच्याकडे यावरूनही भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली होती. तेंव्हापासून बापट यांना निर्णय प्रक्रियेतून डालवण्याबरोबरच पक्ष संघटनेपासूनही लांब ठेवण्यात आले. अलीकडच्या काही महिन्यात बापट यांनी भाजप करत असलेल्या राजकारणावरही नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यावेळीही त्यांची दखल कोणी घेतली नव्हती.

हेही वाचा >>> ‘फ्लो’ मीटर बसविण्यासाठी सोमवारी पाषाण, वारजे परिसराचा पाणीपुरवठा बंद

मात्र निवडणूक जिंकणे अडचणीचे ठरत असल्याचे दिसताच भाजप नेत्यांनी ‘पक्षनिष्ठे’च्या नावाखाली त्यांनाही प्रचारात उतरविले आहे. हाच प्रकार दिवंगत केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर, आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्याबाबत करण्यात आला होता. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप रुग्णशय्येवर असतानाही रुग्णवाहिकेतून मतदानाला उपस्थित राहिले होते. मात्र टिळक कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी नाकारत भाजपने त्यांच्या पक्षनिष्ठेचे बक्षीस त्यांना दिले होते. आता बापट यांच्याबाबतही हीच रणतीनी भाजप नेते वापरत आहेत, असा आरोपही होत आहे.

खंबीर नेते, असे निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची ताकद, हीच भाजपची ओळख आहे. देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः ! गिरीश बापट तुम्ही कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात. इथल्या मनामनांत तुम्ही भाजपाचे कमळ रुजवले. मतदार तुमचा शब्द राखल्याशिवाय राहणार नाही

– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

गिरीश बापट यांना प्रचारात आणणे ही भाजपची गरज होती का? हे माहिती नाही. मी गिरीश बापट यांना भेटून आलो होतो. त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या यातना वाढू नये हीच अपेक्षा आहे.

– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस