मला शेतकरी जवळचा वाटतो, असे शरद पवार म्हणतात. पण  शेतकरी आवडतोय की शेतकऱ्याची जमीन आवडतेय हा लोकांच्या मनात प्रश्न आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. 

हेही वाचा >>> पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींतर्फे सोमवारी सायंकाळी पुण्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.  कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक ते फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृह या मार्गावर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेत राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे सहभागी झाले होते. या वेळी माध्यमांशी बोलताना तावडे यांनी पवार यांच्यावर टीका केली.

हेही वाचा >>> पुणे : विनोद तावडेंना नगरसेविकेचा लागला धक्का आणि झाला संताप…

तावडे म्हणाले, की मी शेतकऱ्यांसोबत आहे, मला शेतकरी जवळचा वाटतो, असे काल शरद पवार म्हणाले. पण बीसीसीआयचे अध्यक्ष असताना दुष्काळाच्या काळात एकदिवसीय सामन्यांच्या ट्रॉफ्या वाटत होतात. त्यावेळी तुम्हाला दुष्काळ नाही आठवला. त्यावेळी तुम्हाला क्रिकेट आवडत होतं. आताही शेतकरी आवडतोय की शेतकऱ्याची जमीन आवडतेय हा लोकांच्या मनात प्रश्न आहे.

Story img Loader