पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक आजपासून पुण्यात सुरू होत आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष पुण्यात दाखल झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर अखिल भारतीय समन्वय बैठक आजपासून शनिवारपर्यंत होत आहे. या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांना विशेष अतिथी दर्जा; पुणे दौऱ्यानिमित्त मंत्रालयातून आदेश

त्यात सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे नेते जे. पी. नड्डाजी आणि राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोषजी यांचाही समावेश आहे. या बैठकीसाठी नड्डा आणि संतोष पुण्यात दाखल झाले. या बैठकीत संघटनांचा कार्यअहवाल सादर करण्यात येईल. तसेत सविस्तर चर्चा होऊन पुढील कार्याची दिशा आणि संघ परिवारातील संघटनांच्या समन्वयाची कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे.