जितेंद्र आव्हाड यांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या. २०२४ च्या निवडणूका होतील तेव्हा बघू कोणाच्या पायाखालची वाळू सरकते. पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांना साथ देण्याचे काम बारामतीकर नक्की करतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्हाला बहुमत मिळालं होतं. पण दगा फटका झाला, धोकेबाजी झाली. राज्यातील १२ कोटी जनतेने ते पाहिले आहे. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. बावनकुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

हेही वाचा : लोहगावमध्ये गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा; २० हजार रुपयांची रोकड जप्त

बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांना काय बोलायचं ते बोलू द्या. २०२४ मध्ये निवडणूका होतील तेव्हा बघू की कोणाच्या पायाखालची वाळू सरकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला बारामतीकर नक्कीच साथ देतील. असा टोला त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे. पुढे ते म्हणाले की, आमचं मिशन बारामती किंवा मुंबई नाही. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर त्यांच्या भरोशावर भाजपा शिवसेना एकत्र लढणार आहे.

हेही वाचा : पुणे : चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याबाबतचा अहवाल गुरुवारी सादर होण्याची शक्यता ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मोलाच ठरेल. महाराष्ट्र आता पुन्हा ती चूक करणार नाही. जनता आमच्या पाठीशी आहे. अगोदर देखील होती. एकनाथ शिंदेंना जनतेच पाठबळ मिळत आहे. हिंदुत्वाचे रक्षण करण्याकरिता आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन ते भाजपसोबत आलेले आहेत. ठाणे लोकसभेबाबत एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना पाठबळ मिळेल. शिंदे जेवढे उमेदवार देतील त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजप ची आहे. अस देखील ते म्हणाले आहेत. 

Story img Loader