पुणे : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी (२१ जुलै) बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी, मंत्री उपस्थित राहणार आहे. बैठकीसाठी एक हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त बालेवाडी परिसरात तैनात करण्यात आला आहे.
हे ही वाचा… मायक्रोसॉफ्टच्या बिघाडामुळे विमाने जमिनीवरच! जाणून घ्या पुण्यातून किती विमाने रद्द …
बैठकीत अमित शहा मार्गदर्शन करणार असून, ते सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित हाॅटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत. बैठकीत वरिष्ठ पदाधिकारी, मंत्री उपस्थित राहणार आहेत. बालेवाडी परिसरात एक हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वरिष्ठ नेते बैठकीत सहभागी होणार असल्याने रविवारी बालेवाडी भागातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. अतिमहत्वाच्या व्यक्तींचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.