अविनाश कवठेकर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम न ऐकणाऱ्या कार्यकर्त्यांना पदावरून हटविण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे शुक्रवारी दिला. कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेच पाहिजे आणि त्या संदर्भातील छायाचित्रे समाजमाध्यमांत दिसली पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.

Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Forest Minister Ganesh Naik was upset with officials response and warn to forest officials
अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!
ajit pawar group on suresh dhas
Suraj Chavan: “..तेव्हा गृहखातं झोपा काढत होतं काय?”, सुरेश धसांच्या विधानानंतर अजित पवार गटाच्या नेत्याची टीका

भोर विधानसभा मतदारसंघात आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी अवघे १५ पदाधिकारी उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भोर, पुरंदर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. भोर विधानसभा मतदारसंघासाठी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमासाठी शेवटची मुदत दिली जाईल, असे बावनकुळे म्हणाले.

आणखी वाचा-‘ससून’च्या अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सगळे चौकशीच्या फेर्‍यात

दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचा निर्धार व्यक्त करताना त्यांनी काही सूचना केल्या. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, लोकसभा प्रवास संयोजक संजय ऊर्फ बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, शहराध्यक्ष धीरज घाटे, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांच्यासह माजी नगरसेवक या वेळी उपस्थित होते.

कार्यकर्ता संघटनेचा प्राण असतो. भाजप कार्यकर्त्यांनीच मोठा केलेला पक्ष आहे. राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता सर्वोच्च पदावर केवळ भाजपमध्ये जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याचे उदाहरण आहे. मोदी यांच्या संकल्पनेतील भारत घडवायचा असेल, तर महाविजय २०२४ अभियान यशस्वी करावे लागेल. त्यासाठीची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यावर आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader