Pune Cantonement Vidhan sabha Result : पुणे : शहरातील पुणे कँटोन्मेंट मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांनी १० हजार ३२० मतांचे मताधिक्य मिळवून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. कांबळे यांना ७६ हजार ३२ मतदान झाले, तर बागवे यांना ६५ हजार ७१२ मते मिळाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत कांबळे यांनी बागवे यांचा केवळ पाच हजार १२ मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत सहा मतदारसंघापैकी सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणाऱ्या या मतदारसंघामधील मताधिक्य काँग्रेसला टिकवता आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र खऱ्या अर्थाने माझ्या विजयात लाडक्या बहिणींचे श्रेय आहे, अशी स्पष्टोक्ती विजय झाल्यनंतर कांबळे यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कँटोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसने बेरोजगारी, मतदारसंघातील विकासकामे हे मुद्दे प्रचारात आणून कांबळे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारसंघात बहुधर्मीय मतदारांची संख्या लक्षात घेऊन कांबळे यांनी तितक्याच कडवटपणे प्रचार केला. भाजपच्या ‘बटेंगे ते कटेंगे’ या प्रचारावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ‘एक है तो सेफ है’ यावरून थेट धार्मिकतेच्या आधावारावर मतदारांना आव्हान करून मतांचे गणित जुळवून आल्याचे दिसले.

हेही वाचा…शहरात जल्लोष; अनुचित घटना नाहीत- पोलिसांचा कडक बंदोबस्त

मतदारसंख्येच्या दृष्टीने लहान असलेल्या पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मागील तीन निवडणुकांच्या तुलनेत मतदान टक्का वाढला होता. पुरुष मतदारांच्या बरोबरीने महिलांनीही उत्स्फूर्तपणे मतदान केले असून लाडक्या बहीणांचा वाटा मोठा आहे, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीत प्रबोधन मंचाची कामगिरी ‘गेम चेंजर’

ठळक वैशिष्ट्ये

-वंचित बहुजन आघाडीचे नीलेश आल्हाट यांनी आठ हजार मते मिळविल्याने काँग्रेसला फटका
-स्थानिक मुद्द्यांवरच्या प्रश्नांना बगल देऊन मतदारांचे ध्रुवीकरण करण्यात भाजपला यश
-संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रचारसभा आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवण कल्याण यांच्या प्रचार रॅलीचा फायदा
-काँग्रेसच्या प्रचारांमधून होणाऱ्या आरोपांना तितक्याच जोमाने प्रत्युत्तर

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp sunil kamble triumphs in pune cantonment credits victory to ladki bahin pune print news vvp 08 psg