आम्ही सावरकरवादी, हिंदुत्त्ववादी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. उद्धव ठाकरे यांना सावरकरांविषयी आत्मीयता असेल, तर त्यांनी राहुल गांधी यांची साथ त्यांनी सोडली पाहिजे. तर ते सावरकरांना खऱ्या अर्थाने मानतात हे पटेल, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
हेही वाचा >>> पुणे : विनोद तावडेंना नगरसेविकेचा लागला धक्का आणि झाला संताप…
स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींतर्फे सोमवारी सायंकाळी पुण्यात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक ते फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृह या मार्गावर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेत राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे सहभागी झाले होते. या वेळी माध्यमांशी बोलताना तावडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तावडे म्हणाले, की उद्धव ठाकरे यांचे मला आश्चर्य वाटते. सावरकर अपमान एकदम ओके, राम मंदिर विरोधकांबरोबर एकदम ओके आहेत. कारण मुख्यमंत्री पदाची खुर्ची एकदम ओके आहे. आम्ही सावरकरवादी, हिंदुत्त्ववादी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेला सावरकर आणि हिंदुत्त्ववादी या विषयी आत्मीयता असेल तर त्यांनी राहुल गांधी यांची साथ त्यांनी सोडली पाहिजे. तर ते सावरकरांना खऱ्या अर्थाने मानतात हे पटेल.