पिंपरी : आगामी महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेवर पुन्हा भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षे एकहाती सत्ता होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरावर निर्विवाद वर्चस्व होते. भाजपने २०१७ मध्ये राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला. महापालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुलले होते. आता अजित पवार हेच महायुतीत भाजपसोबत सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र की स्वबळावर लढणार याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेवर भाजपने पडदा टाकला आहे. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, भाजप महापालिकेच्या सर्व १२८ जागा लढविणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती नसणार आहे.

Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Dhananjay Munde. Ajit Pawar , Maratha Kranti Morcha,
धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची अजित पवारांकडे मागणी, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन
constitution of india article 351
समोरच्या बाकावरून: राज्यघटनेसाठी काँग्रेसने काय केले?
Vijay Wadettiwar On Bmc Election 2025
Vijay Wadettiwar : ‘मविआ’त बिघाडी? महापालिकेच्या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे स्वबळाचे संकेत; वडेट्टीवार म्हणाले, ‘त्यांच्या पक्षाची…’
uddhav Thackeray Bhaskar Jadhav
बिनखात्याच्या ४१ मंत्र्यांचा अनोखा विक्रम, भास्कर जाधव म्हणाले…
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
Congress protest against BJP , Congress Mumbai office attack , Congress Nagpur protest ,
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”

हेही वाचा >>> लोणावळा: आई एकविरा गडावर भाविकांवर मधमाशांचा हल्ला; नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली घटना

भाजप नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार भाजप महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे. महापालिकेवर पुन्हा भाजपची एकहाती सत्ता आणली जाणार आहे. मागीलवेळी भाजपचे ७७ नगरसेवक होते. यावेळी त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले असल्याचेही जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे महापालिका निवडणुकीदरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला राहावा : नाना भानगिरे

प्रशासकीय राजवटीत जनतेची कामे रखडली प्रशासकीय राजवटीत जनतेची कामे होत नाहीत. कामे रखडली आहेत. पाणी, रस्ते, आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. वाकड, हिंजवडी, पिंपळे सौदागर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मार्च, एप्रिल पर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

Story img Loader