पिंपरी- चिंचवड: आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचीच पुनरावृत्ती होईल. भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील आणि भाजपा नंबर- १ होईल, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारिणीची संघटनात्मक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वाधिक जागा मिळवून नंबर- १ राहिल्याबद्दल विजेते उमेदवार, पक्षाचे कार्यकर्ते, भाजपा परिवारातील सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले.

आणखी वाचा-पुण्यातील माजी नगरसेविकेवर बलात्कार प्रकरण : आरोपीची जामिनावर सुटका

यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक योगेश बाचल माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस शितल शिंदे, शैलजा मोळक, संजय मंगोडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे आदी उपस्थित होते.

राज्यातील नुकतेच २ हजार ३५९ ग्रामंपचायतींची निवडणूक झाली. त्यापैकी तब्बल भाजपाने ७१६ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. महायुतीला १ हजार ३६९ ठिकाणी विजय मिळाला आहे. विजयाचा हा वारू असाच कायम ठेवण्यासाठी संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत करावी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने राज्यात ‘महाविजय- २०२४’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे बूथनिहाय यंत्रणा कामाला लागली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पूर्ण बहुमताने विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

आणखी वाचा-पिंपरी : प्रदूषण करणाऱ्यांवर आता कारवाई, महापालिकेची विशेष पथके तैनात

शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजपा नंबर- १ राहील, असा विश्वास आहे. भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षश्रेष्ठींच्या निर्देशाप्रमाणे संघटनात्मक कार्यात सक्रीय आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत मोदी सरकारचे महत्त्वाकांक्षी निर्णय आणि कल्याणकारी योजना आम्ही पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांचा कल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजुने असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभावी संघटन हेच भाजपाच्या यशाची गुरूकिल्ली आहे.