पिंपरी-चिंचवड पालिकेची सत्ता पुन्हा भाजपाच्या ताब्यात येणार आहे. त्यादृष्टीने भाजपाचे कार्यकर्ते केव्हापासूनच तयारीला लागले आहेत. ‘अबकी बार, १०० पार’ ही आमची यंदाची घोषणा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी आज(बुधवार) व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिला. त्यामुळे पालिका निवडणुकांविषयी होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही
Allu Arjun children whisked away after attack on home
Video: हल्ला झाल्यानंतर पत्नी, मुलांना घेऊन अल्लू अर्जुनने सोडलं घर; त्याचे वडील म्हणाले, “आज आमच्या घरी जे घडलं ते…”
illegal construction in Mahabaleshwar are demolish
महाबळेश्वर अवैद्य बांधकामावर हातोडा
akhil bharatiya marathi sahitya sammelan 2024 delhi, swatantrya veer savarkar, nathuram godse
संमेलनस्थळाला गोडसेचे नाव देण्यासाठी धमक्या, साहित्य संमेलन आयोजक संस्थेचे संजय नहार यांचा दावा
Congress protest against BJP , Congress Mumbai office attack , Congress Nagpur protest ,
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
Sanjay Raut on Kalyan Ajmera Society Dispute
Kalyan Society Dispute: “कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे”, ठाकरे गटाची मागणी!

पत्रकारांशी बोलताना आमदार लांडगे म्हणाले, सहा महिन्यांपेक्षा जास्तकाळ प्रशासक ठेवता येणार नाही, अशी संविधानात तरतूद आहे. तरीही राज्यातील अनेक महापालिकांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुसुरू होता. आता सर्वोच्च्य न्यायालयानेच आदेश दिल्याने निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. शहरात एकूण सहा मंडल असून या मंडल पदाधिकाऱ्यांची संख्या ५५० आहे. जिल्हा कार्यकारिणी १५० जणांची आहे. शहरात एकूण ३५३ शक्ती केंद्रप्रमुख आणि १ हजार ३०८ बूथप्रमुख आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पालिका निवडणुकीत निश्चितपणे यशस्वी होणार आहोत, असेही लांडगे म्हणाले.

‘राज्य सरकारमुळे ओबीसींची हानी’ –

राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, ही भाजपाची आग्रही मागणी आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे वेळकाढूपणा केला. ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी समाजाची मोठी हानी झाली आहे, अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

Story img Loader