Karnataka Election BJP कर्नाटकमध्ये भाजपची एकहाती सत्ता येईल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपच्या विजयाने विरोधक हतबल होतील असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लागवलाय. तसेच, पिंपरी- चिंचवड शहरासह राज्यातील ७५ जिल्ह्याध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पिंपरी- चिंचवडमध्ये जिल्हा भाजपकडून बूथ आणि पदाधिकारी बैठक आयोजित केली होती.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पिंपरी- चिंचवडमध्ये जिल्हा भाजपकडून बूथ आणि शक्ती प्रमुख केंद्र तसेच पदाधिकारी बैठक आयोजित केली होती. १ लाख घरी प्रवास करण्याची योजना तयार केली. प्रत्येक विधानसभेत साठ हजार घरी प्रवास करणार आहोत. २० मे पर्यंत हा प्रवास पूर्ण होणार आहे. प्रत्येक बूथवर २५ पक्ष प्रवेश होतील अशी योजना आखली आहे. पुढे ते म्हणाले, कर्नाटक निवडणुकीत भाजपचा विजयी नक्की होईल. विरोधक हतबल झालेली दिसतील. मोदींच्या नेतृत्वाखाली कर्नाटकमध्ये बहुमताने आमचे सरकार येईल. पुढे ते म्हणाले, पिंपरी- चिंचवडसह राज्यातील ७५ जिल्ह्याध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू झाली. आमचे पदाधिकारी त्यावर चर्चा करणार असून त्याचा अहवाल लवकरच सादर करणार आहोत.

bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव
Srigonda Constituency BJP election Assembly Election 2024 print politics news
लक्षवेधी लढत: श्रीगोंदा : बंडखोरीमुळे चुरशीची लढाई
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?