लोणावळा : मावळातील पवनानगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. भाजप पदाधिकाऱ्याचा हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून मित्राने साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मित्रासह तिघांना अटक केली.

निलेश दत्तात्रय कडू (वय ३२, रा. सावंतवाडी, पवनानगर, ता. मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय बाळू घायाळ (रा. सावंतवाडी, पवनानगर, ता. मावळ), पियूष विश्वनाथ डोंगरे, साहिल साईनाथ जाधव (दोघे रा. प्रभाचीवाडी, ता. मावळ) यांना अटक करण्यात आली. कडू भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी होता आरोपी घायाळ आणि कडू मित्र आहेत. हातऊसने दिलेल्या पैशांमधून त्यांच्यात वाद झाले होते. कडू आणि घायाळ यांच्याविरुद्ध कामशेत आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल झाले होते. ३१ ऑक्टोबर रोजी कडू आणि आरोपी घायाळ, डोंगरे, जाधव प्रभाची वाडी परिसरात रात्री दारु पित होते. हातऊसने दिलेल्या पैशांवरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी कडू याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला.

terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Maharashtra ssc 10th board exam
दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा – मध्य प्रदेशातून गोव्यात गांजाची तस्करी करणारे गजाआड, खडकी परिसरात कारवाई; दहा किलो गांजा जप्त

हेही वाचा – दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला. हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून घायाळने कडूचा खून केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर त्याला तळेगाव दाभाडे परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार डोंगरे, जाधव यांच्याशी संगनमत करुन खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, विजय म्हात्रे यांनी ही कामगिरी केली.

Story img Loader