पुणे : भारतील जनता पक्षाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून केंद्र पातळीवर काम करणाऱ्या एका नेत्याने भाजपमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेवकांचा प्रवेश घडवून आणल्याने ही नाराजी पसरली आहे. पक्षात इच्छुकांची रांग लागलेली असताना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देत महापालिकेचा शब्द का दिला जात असल्याची चर्चा आहे.

पक्ष वाढीसाठी गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांकडे आणि पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करून राज्यात आणि केंद्रात वजन वाढविण्यासाठी हे पक्ष प्रवेश करून घेण्यात येत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या पाच माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे नाराज झालेल्या भाजपच्या मध्यवर्ती भागातील पदाधिकाऱ्याने फ्लेक्स लावून शेरो शायरीच्या माध्यमातून मनातील खदखद व्यक्त केली आहे. ‘दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों’ अशा आशयाचे हे फ्लेक्स आहेत.

CBSE instructed affiliated schools to publish staff and other information on their websites
संकेतस्थळावर माहिती, कागदपत्रे जाहीर न करणाऱ्या शाळांवर कारवाई; सीबीएसईचा इशारा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
ajit pawar devendra fadnavis
“जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांचा पोलिसांवर संताप; गृहमंत्री फडणवीस म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा…संकेतस्थळावर माहिती, कागदपत्रे जाहीर न करणाऱ्या शाळांवर कारवाई; सीबीएसईचा इशारा

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या सोमवार पेठ, मंगळवार पेठ तसेच कँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील रास्ता पेठ परिसरात हे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. भाजपचे महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांचे सहकारी असलेले विशाल दरेकर यांचे नाव या फ्लेक्सच्या खाली आहे. यावर पक्ष प्रवेशाबाबत स्पष्टपणे लिहिण्यात आले नसले तरी, यामुळे शहर भाजपमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा…राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे शहरातील स्थानिक पदाधिकारी आणि राज्यात आणि केंद्रात नेत्यांमधील संघर्ष वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्या कार्यकर्त्यांनी झाड जपले, त्यांच्यावर महापालिका निवडणुकीला फळ चाखण्याची वेळ आली. तेव्हा इतर पक्षातील लोकांना संधी देण्यात येत असल्याची खंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.


Story img Loader