लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : ‘भाजपचा कोणताही कार्यकर्ता नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. तर महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार केला जाईल. मलिक यांना ‘एबी’ फॉर्म न देण्याचा निर्णय झाला होता. मात्र अजित पवार यांच्या पक्षांतर्गत निर्णयानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे मलिक यांचा प्रचार केला जाणार नाही,’ अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषेदत मांडली.
भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र मिडिया सेंटरमध्ये दरेकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही भूमिका घेतली. प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, हेमंत लेले आणि पुष्कर तुळजापूरकर यावेळी उपस्थित होते. उचकवा उचकवी करण्यात शरद पवार यांचा हात कोणीही धरू शकणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
आणखी वाचा-महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या संपर्कात असून निवडणुकीनंतर काहीही घडू शकते, असे विधान मलिक यांनी केले होते. यासंदर्भात मलिक यांनी ज्योतिषगिरी बंद करावी, असा सल्लाही दरेकर यांनी दिला. दरेकर म्हणाले की, मलिक यांनी अशी विधाने करण्याऐवजी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावे. ते म्हणतात तसे काही होणार नाही. निवडणुकीनंतर भाजप, शिंदे आणि अजित पवार यांचे एकत्रित सरकार असेल. निवडणुकीवेळी काही नेते सोईने विधाने करतात. मलिक यांचे हे विधान त्याचाच एक भाग आहे.
‘मलिक यांच्या प्रचाराबाबत भाजपने यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपचा कोणताही कार्यकर्ता मलिक यांचा प्रचार करणार नाही. मलिकांनी उमेदवारी अर्ज भरलेल्या मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे. मलिक यांना एबी फॉर्म न देण्याचा निर्णय झाला होता. मात्र अचानक त्यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला. राज्यातील चार ते पाच जागांवर असा निर्णय झाला आहे. मात्र महायुतीला बाधा होऊ नये, यासाठी भाजपने समजुतीची भूमिका घेतली आहे,’ असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-पुणे: रामटेकडीत डंपर, जेसीबी यंत्र पेटवून देण्याची घटना; ठेकेदाराकडून पोलिसांकडे तक्रार
शरद पवार यांच्यावर टीका
‘राज्याचे अर्थमंत्री जीएसटी परिषदेच्या बैठकीला सातत्याने गैरहजर राहिले. त्यामुळे जीएसटीबाबतची राज्याची भूमिका मांडली गेली नाही, ’ असे सांगत शरद पवार यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यासंदर्भात बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, शरद पवार खोट्या गोष्टी सातत्याने मांडत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना जीएसटी बैठकीत व्यापारी अडचणी मांडू शकले नाहीत. अजित पवार केवळ दोन बैठकीस गैरहजर होते. निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना खोटे राजकीय कथानक रचायचे आहे. जीएसटीच्या माध्यमातून उचकवा उचकवी करता येते का, याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.