टाटा मोटर्सच्या चिखलीतील कार विभागात २८ डिसेंबर ते दोन जानेवारी २०१६ पर्यंत असे सहा दिवस ‘ब्लॉक क्लोजर’ असल्याचे कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. कार विभागातील विविध दुरुस्त्यांच्या कामासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
‘ब्लॉक क्लोजर’मुळे टाटा मोटर्सचा कार विभाग बंद राहणार असून तेथील नियमित काम होणार नाही. पेंट विभाग तसेच वेल्ड शॉपमध्ये दुरुस्तीचे काम होणार आहे. २८ डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान असे सहा दिवस ‘ब्लॉक क्लोजर’ राहणार असल्याची नोटीस कंपनीने यापूर्वीच लावली होती. त्यानुसार, सोमवारपासून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. मावळत्या वर्षांची अखेर आणि नव्या वर्षांची सुरुवात, या दोन्ही वेळी ‘ब्लॉक क्लोजर’ करण्यात आला आहे. औद्योगिक मंदीमुळे घटलेल्या मंदीचे कारण देत टाटा मोटर्सने यापूर्वी वेळोवेळी ‘ब्लॉक क्लोजर’ केले आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याचा पर्यायही तपासून पाहण्यात आला. मात्र, लगेचच पूर्ववत सहा दिवसांचा आठवडा करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा