सोलापूर विभागातील दौंड-मनमाड लोहमार्गावर बेलापूर-चितळी-पुणतांबा या स्थानकांदरम्यान दुहेरीकरणासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. निजामाबाद – पुणे ही गाडी ३१ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> पुणे : ट्रकसह खाणीत पडून मजुराचा मृत्यू; दारुच्या नशेत ट्रकचा चालविताना दुर्घटना
याचबरोबर २६ मार्चला कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र, नागपूर-पुणे, नांदेड-पुणे, २७ मार्चला कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र, नांदेड-पुणे-नांदेड, नागपूर-पुणे, पुणे-नागपूर, २८ मार्चला पुणे-नागपूर एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर, पुणे -नांदेड एक्स्प्रेस आणि २९ मार्चला गोंदिया -कोल्हापूर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-जबलपूर एक्स्प्रेसच्या वेळेत २० व २७ मार्च, पुणे-लखनऊ एक्स्प्रेस २१ व २८ मार्च, पुणे-हटिया एक्स्प्रेस २६ मार्च, पुणे-गोरखपूर-एक्स्प्रेस १८ व २५ मार्च रोजी बदल करण्यात आला आहे. याचबरोबर दानापूर-पुणे, हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस, हजरत-निजामुद्दीन-हुबळी, जम्मू-तावी-पुणे झेलम एक्स्प्रेस, हावडा-पुणे एक्स्प्रेस, हटिया-पुणे एक्स्प्रेस, पुणे-हावडा एक्स्प्रेस, कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.