धोकादायक दरड काढण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर आज दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. तर हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून जुन्या महामार्गावरून वाहतूक वळवण्यात आली होती. आज ठीक दोन वाजून दहा मिनिटांनी काम थांबवण्यात आलं. दोन तासांच्या ब्लॉकनंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा – Video : आबाच्या उसामध्ये लई मोठा वाघ.. शेतातील बिबट्याच्या मुक्त संचाराचे चित्रीकरण
हेही वाचा – पुण्यातील स्वयंचलित ‘ई-टाॅयलेट्स’ का पडली बंद?
रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दगड आणि मातीसह धोकादायक दरड काढण्यासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र हे काम साडेतीन तास चाललं होतं. आजदेखील बारा ते दोनच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. विशेष म्हणजे युद्धपातळीवर काम करत दोन तास आणि दहा मिनिटांनी काम थांबवून पुन्हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तरीदेखील वाहनांच्या लांबच लांब रांगा द्रुतगतीमार्गावर बघायला मिळाल्या. दोन तास वाहन चालक ताटकळत थांबलेले होते. वेळीच ब्लॉक संपल्याने वाहन चालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.