या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाव -बसू दुर्गे

शिक्षण -BSc केमिस्ट्री. सध्या M.B.A. (Import & Export ) सुरु

वय-२५  राहणार –श्रमिक वसाहत

कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये मिळूनही साभार नाकारलेले सुरुवातीचे पॅकेज -४ लाख रुपये/वर्ष

इथपर्यंत वाचताना धक्का बसायचं काही विशेष कारण नाही. आजकाल मिळालेली पॅकेज नाकारणे ह्यात फार काही नवीन नाही. आपली योग्यता पॅकेजपेक्षा जास्त आहे असा समज असलेल्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही. विशेष म्हणजे कामाचा, मेहनतीचा आणि एकंदरच जगाचा काडीमात्र अनुभव नसलेले ह्यात कायमच आघाडीवर असतात. तसा हे पॅकेज स्वीकारून एखाद्याला कुठल्यातरी ‘सबसे तेज’ टीव्ही चॅनेलवर एखाद्या अतिउत्साही पत्रकाराला आपले कष्टात गेलेले बालपण आठवत, डोळ्यातले अश्रू लपवल्यासारखे दाखवत मुलाखतही देता आली असती. आणि २-४ दिवस मिरवता आलेही असते. पण ती संधी बसूने आत्तातरी दवडलेली आहे.

पण इथूनच बसू दुर्गे नावाच्या ह्या माणसाचे वेगळेपण दिसायला सुरु होते, कारण हा मुलगा पुण्यात कोथरूडमध्ये, गेले बरीच वर्षे भाजीवाला म्हणून कार्यरत आहे. ह्याचे कुटुंब मुळातले गुलबर्ग्याच्या बाजूचे पण हा जन्मापासून पुण्यातच. शिक्षण महापालिकेच्याच शाळेत, पहिला नंबर न चुकवणारा, विविध शिष्यवृत्ती मिळालेला मुलगा. वडिलांची तब्येत बरी नसायची, ते लहानपणापासून ह्याला भाजी विकायच्या पथारीवर मदतीला घेऊन जायचे. लवकरच वडिलांनी त्याच्यातली व्यवसायाची चमक ओळखली आणि त्याच्या अंगावर सगळाच व्यवसाय सोडायला सुरुवात केली. शिक्षण एकीकडे सुरूच. काही वर्षांनी तो ९वीत असताना वडील टीबी मुळे गेले. आईलाही तोच आजार झाला, तशा ससूनमधून टीबीच्या गोळ्या मोफत मिळायच्या. पण त्यांचा फार काळ उपयोग झाला नाही. ११ वीत असताना आईही हे जग सोडून गेली. लहान असला तरी व्यवसाय सांभाळणारा म्हणून बहिणीचे, मोठ्या भावाचे लग्न समाजाच्या प्रथेप्रमाणे वर्षभरातच करावे लागले. पण स्वतःचे शिक्षण सुरूच ठेवले.
साधारण तेव्हाच फुटपाथवर असणारी त्यांची मंडई रहदारीला त्रास होतो म्हणून महापालिकेकडून उठवली गेली. झालं रोजचा ठरलेला व्यवसाय संपला. मग त्यात नवीन रस्ता शोधायला लागला. मग हॉटेल्सना भाज्या पुरवायचा होलसेल व्यापार सुरु केला. छोटीछोटी हॉटेल्स महिन्याच्या उधारीवर भाज्या घेऊ लागली, जरा बरे दिवस दिसतायत असे वाटले, तेवढ्यात पोलिसांच्या हुक्का पार्लर विरोधी कारवाईमुळे त्यातली बरीच हॉटेल अचानक बंद झाली. असा गाशा गुंडाळताना भाजीचे थकलेले पैसे देण्याची नियत किती जणांची असते? त्यामुळे बुडालेच. प्रत्येकाकडे काही हजार ते लाखभराची उधारी होती. नुकसान झालं आणि कर्ज झाले.

मग गरजेसाठी आणि रुग्णसेवेच्या आवडीमुळे पॅथॉलॉजीचा DMLT हा अभ्यासक्रम जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये पार्टटाईम नोकरीही करून झाली. पण त्यातून पैसा म्हणजे सर्वस्व नसतो हेही उमगले. एवढा वाईट काळ असतानाही स्वतःचा व्यवसाय करायची त्याची जिद्द संपली नाही. मोठा तोटा झाला असला तरी एव्हाना भाजीच्या धंद्यातल्या सगळ्या खाचाखोचा चांगल्या माहिती झाल्या होत्या. मुळात भाज्या खरेदी करताना कशा आणि कुठून घ्याव्यात ह्याची चांगली समज आली होती. घर तर चालवायचेच होते. मग पुन्हा पौडरोड भागात दारोदार जावून हातगाडीवर भाज्या विकायला सुरुवात केली. ह्या व्यवसायाने पुन्हा साथ दिली आणि गाडी रुळावर यायला लागली. वर्षा दोन वर्षात, थोडे पैसे साठवून एका दुकानाच्या बाहेरची रिकामी जागा भाड्याने घेतली. तिथे दोन बाजूला आडोसे करून आणि वरती तात्पुरते छत टाकून भाजीचे बऱ्यापैकी मोठे दुकान सुरु केले.
तुम्ही म्हणाल असे भाजीवालेही खूप दिसतात. त्यात काय ह्या माणसाचा वेगळेपणा?तुमचं बरोबर.

पण इथे फरक आहे तो त्याच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीत. त्याने खरेदीपासूनच ते वेगळेपण जपलंय. फक्त पुण्याच्या मार्केट मधून भाज्या न घेता तो वाशीच्या मार्केटमधूनही होलसेल भावात खरेदी करतो. हे कमी म्हणून काय, स्वतःची खरेदी फक्त मार्केटच्या मालावरच मर्यादित न ठेवता अहमदनगर ते कोकणापर्यंत आणि कोल्हापूरपासून ते काश्मीरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱयांच्याबरोबर थेट सौदे करून ताजा माल शेतातून ग्राहकाच्या पर्यंत पोचवतो. काही भागातल्या स्पेशालिटी असलेल्या आणि पुण्यात सर्रास न मिळणारया भाज्या तो शेतकर्यांच्याकडून आवर्जून मागवून घेतो. कोल्हापूरच्या बाजूला मिळणारी पोकळा भाजी म्हणा किंवा हल्ली फारशी न मिळणारी हातग्याची फुलं अशा भाज्या, बाराही महिने मिळणारी कैरी ही त्याच्या दुकानाची अजून एक खासियत. त्याच्याकडच्या काश्मीरी मिरच्या ह्या खऱ्याच काश्मीरमधून आलेल्या असतात, त्याही इतर दुकानाच्यापेक्षा ग्राहकांच्यापर्यंत बऱ्याच लवकर पोहोचतात. ह्याशिवाय सिझनल देशी, विदेशी फळे असतातच. हे सगळे करताना व्यवहार चोख ठेवल्यामुळे, सगळ्याच व्यापाऱयांबरोबर त्याचे संबंध चांगले आहेत.

कुठल्याही चांगल्या दुकानदाराला खरेदीच्या बरोबर विक्री आणि सर्व्हिसकडे तेवढेच लक्ष द्यावे लागते. बसुचे दोन्ही बाजूंच्याकडे तेवढेच लक्ष असते. दुकान जरी लहान असले तरी ग्राहकांना सर्व्हिस मोठ्या दुकानासारखी देण्याकडे त्याचा कल असतो. ह्यात त्याला त्याच्या भावाची ‘सिद्धू’ची बरीच मदत होते. नुसतेच नारळ विकण्यापेक्षा आता खोबरं खवायचे मशीन बसवून सिद्धू एकदम खोबरंच ग्राहकाच्या ताब्यात देतो. आलेल्या ग्राहकांना त्यांच्या गाडीपर्यंत भाज्यांच्या पिशव्या देणे, आसपासच्या भागातल्या जेष्ठ नागरिक आणि इतरही सगळ्या ग्राहकांना फक्त एका फोनवर हवातेवढा माल घरपोच, तोही अगदी हसतमुखाने देणे हे ह्या दोन्ही भावांचे अजून एक वैशिष्ट्य. ह्या सगळ्यात एखाद्या आज्जी, आजोबांना मेडिकलमधून औषध घेऊन तेही भाजीबरोबरच पोचते करणे अशा गोष्टीही असतात. तेवढ्यात मोठ्यांच्या बरोबर आलेल्या छोट्या मुलांच्या हातावर खाऊसाठी आपणहूनच कधी भुईमुगाच्या शेंगा, कधी त्यांना ताजी मावळी काकडी, गाजरे देत मुलांबद्दलचे प्रेम न बोलता व्यक्त करतो. हाताळून किंचित खराब झालेल्या भाज्या आजूबाजूच्या गरजू लोकांना प्रत्येकी ठराविक दिवस ठरवून फुकट वाटतो. दुसऱया दिवशी पुन्हा ताजी भाजीच दुकानात असेल ह्याची काळजी घेतो. पैसे घ्यायला भाज्यांच्या  छोट्या दुकानात सहसा न दिसणारी कार्ड, चेकने महिन्याचे पेमेंट घेण्याची पद्धतही त्याच्याकडे आहेच. बँकेचे अकाऊंट मेंटेन केलेले आहे.

त्याचा रोजचा दिवस पहाटेच्याही आधी ३ वाजता मार्केट यार्डात जावून सुरु होतो. खरेदीत ३-४ तास जातात, मग साधारण ७.३० वाजता दुकानात येवून रोजच्या भाज्या लावून ८ वाजायच्या आधी दुकान सुरु करतो. कधीतरी त्याच्या आधीच कुठल्या ऑर्डरची भाजी पोचवायला लागते. आता कामाला हाताखाली ४ माणसेही आहेत. त्यामुळे ते काम एकीकडे सुरूच असते. त्यांनतर दुकान सुरु राहते दुपारी १ वाजेपर्यंत. पण दुकान बंद करून तो कॉलेजमध्ये लेक्चरसाठी जातो. काहीवेळा वर्गातल्या सगळ्या मुलांनी आपल्या कार्यबाहुल्यामुळे(?) लेक्चर सामुहिक बंक केलेलं असलं तरी हा प्रामाणिकपणे प्रोफेसर किंवा प्रिन्सिपॉलसरांच्याकडे आपली उपस्थिती नोंदवून मगच परत घरी येतो. आल्यावर घेतलेली एक, दीड तास विश्रांतीही ह्याला रात्रीपर्यंत पुरते. संध्याकाळी पुन्हा काम करून रात्री ९ नंतर दुकान बंद करून घरी जावून जेवून झोपतो ते दुसऱ्या दिवशी नव्या दमाने कामाला जायला. मला कमल हसनच्या ‘चाची ४२०’ मधलं “दौडा दौडा भागा भागासा” आठवलं. न राहवून बसूला विचारलेच’ हे सगळे  शिकलास कुठे?’त्याचे क्षणात उत्तर आले, “अंबरसर (हा मला सर का म्हणतो ते तोच जाणे) आईवडिलांमुळे सचोटीने व्यवसाय करायला शिकलो आणि रा.स्व.संघाच्या शाखेत जावून संस्कार आणि लोकांच्या बरोबर बोलायला शिकलो, अजूनही शिकतोय. मोठ्या कार्यक्रमांना आणि इतरवेळी जमेल तेव्हा संघाच्या शाखेत हजेरी लावतोच. संघाच्या शिक्षकांचे माझ्यावर तेवढेच संस्कार आहेत. रस्त्यावर व्यवसाय करताना अडचणी तर येतातच, कधी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा तर कधी दारुड्या लोकांचा त्रास होतो. पण त्यांच्याशी बोलून त्यातून मार्ग काढतो, हे सगळे संघाच्या संस्कारांच्या आणि परिसरातल्या ओळख झालेल्या चांगल्या लोकांच्यामुळे निभावले जाते.”
त्याला त्याच्या शिक्षणाचा उपयोग करून त्याचा व्यवसाय मोठा करून, देशाच्या बाहेर न्यायचा आहे, त्याच्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट करायची तयारी आहे, हे मात्र माझ्या निश्चितच लक्षात आलं.
मॅनेजमेंटच्या अभ्यासात कुठेतरी ‘मॅकडोनाल्डची’ ग्राहकाला द्यायच्या बाबतीत असलेली अंतर्गत चतु:सूत्री( गाईडलाईन्स)वाचल्याची आठवते. त्यांच्याकरता असली तरी जगातल्या प्रत्येक व्यवसायाला लागू पडेल अशीच आहे. ती अवलंबणे तिथल्या प्रत्येक व्यक्तीवर बंधनकारक असते. म्हणजे QSCV.
Q-क्वालिटी,S-सर्व्हिस,C-कॉस्ट,V-व्हॅल्यू

वरच्या सगळ्या गोष्टी ‘ग्राहकाला’ द्यायच्या असतात हे जाताजाता आपल्याकडच्या काही दुकानदारांना आवर्जून सांगावेसे वाटते. किराणा आणि लहान दुकानदारांवर ‘एफडीए’मुळे गदा येण्याचा दावा करणाऱ्या संघटनांनी त्याचा बाऊ करायच्या आधी, आपल्याकडे क्षुल्लक समजल्या जाणाऱ्या गोष्टी, आपले सभासद ग्राहकाला देतात का?  हेही आवर्जून बघायला पाहिजे. ह्या वरच्या सगळ्या गोष्टी असतील आणि जोडीला ग्राहकाबद्दल भारतीय माणसाला उपजत मिळालेली आपुलकी असेल तर बहुतेक भारतीय ग्राहक एखाद्या मॉलमध्ये जाण्यापेक्षा, आपल्या भागातल्या छोट्या व्यापाऱयांकडून किराणा आणि भाजी आवर्जून घेत राहतील, ह्याबद्दल मलातरी काही शंका नाही.
विषयांतर झालं थोडं, पण QSCV ह्या चारी गोष्टी बसूने माहिती नसतानाही, मलातरी अवलंबलेल्या दिसल्या. उगाच नाही हा मुलगा आज छोटे दुकान भाड्याने मांडूनही कोटीच्या घरात उलाढाल करत. वर्षाला ४ लाखाचे पॅकेज घेऊन दुसऱयाची नोकरी का करावी त्याने? त्यात काही चूक वाटते का त्याची? अशी झेप घ्यायला कुठला वारसा नसेल तरी चालतो, घरचा अमाप पैसा नसेल तरी चालतो. लागते ती प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत घ्यायची तयारी आणि उद्योजकतेचा ध्यास.’मेक इन इंडिया’ अजून काय वेगळे आहे?
बोला भारतीय उद्योजकता झिंदाबाद !

– अंबर कर्वे