पिंपरी-चिंचवडमध्ये खुनाचं सत्र सुरूच आहे. गुरुवारी रात्री चाकण परिसरातील शेलपिंपळगाव येथे एकाची बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश उर्फ तात्या सुभाष कराळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. नागेश हे पैलवान होते असंदेखील सांगण्यात येत आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी योगेश बाजीराव दौंडकर याच्यासह इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नागेश हे मिलिंद बिअर शॉपी येथून मोटारीतून घरी जात होते. ते मोटारीत बसताच अचानक दुसऱ्या मोटारीमधून आलेल्या दोघांनी बेसावध नागेश यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात त्यांच्या डोक्यात, तोंडावर, छातीत आणि पोटात गोळ्या लागल्या असून त्यांचा मृत्यू झाला आहे. नागेश हे पैलवान होते. गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा मोटारीत असल्याने त्यांना हल्लखोरांचा प्रतिकार करता आला नाही. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचं चाकण पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी योगेश बाजीराव दौंडकर याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गेल्या आठ दिवसात तीन खून!

पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या आठ दिवसांमध्ये तीन खून झाले आहेत. पिंपळे गुरव येथे तडीपार गुंड गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण यांनी भर चौकात योगेश जगताप याच्यावर अंदाधुंद १० गोळ्या झाडून खून केला. तर, गुरुवारी स्टेटस ठेवण्यावरून झालेल्या वादात सख्ख्या चुलत भावानेच खून केल्याचं उघड झालं आहे. तर, चाकण परिसरात नागेश यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे. पोलीस आयुक्तांची पिंपरी-चिंचवड हे गुन्हेगारीमुक्त आणि भयमुक्त संकल्पना कुठे गेली असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bodybuilder murder in pimpri chinchwad caught in cctv kjp 91 sgy