पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बावधन मध्ये खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलीस आयुक्तालयात प्राप्त झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बीडीडीएस पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी घाबरून न जाण्याच आवाहन केलं आहे. असे फेक मेल नेहमीच प्राप्त होतात. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील बावधन मध्ये खासगी शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल मध्यरात्री उशिरा पिंपरी- चिंचवड आयुक्तालयाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बीडीडीएस पथक, पोलीस दाखल झाले आहेत. अनेकदा असे फेक मेल आयुक्तालयाला प्राप्त होतात. त्याची शहानिशा करणे हे पोलिसांचे काम आहे. कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा मेल कुणी केला याचा तपास पोलीस घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा