या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाळेची पुस्तके रद्दीत जाण्याऐवजी ती गरजूंपर्यंत जावीत यासाठी ‘टेक्स्ट बुक बँक’ हा उपक्रम दुवा ठरत आहे. सोलापुरातून पुण्यात प्रवास केलेल्या या उपक्रमाला पुण्यात चांगला प्रतिसादही मिळत आहे.

शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके बांधून ठेवण्याची आणि नव्या पुस्तकांच्या खरेदीची घाई सुरू होते.  अशावेळी आदल्या वर्षीच्या इयत्तेची पुस्तके रद्दीच्या दुकानाची वाट धरतात. तर इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये पालक आणि शिक्षकांचा पुस्तकांवरून वाद सुरू असतो. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शासनाकडून पुस्तके पुरवली जातात. मात्र इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या मुलांच्या पालकांना पुस्तकांची भलीमोठी यादी दिली जाते किंवा काहीवेळा त्यासाठी शुल्क मागितले जाते.

ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘टेक्स्ट बुक बँक’ हा उपक्रम सुरू झाला. सोलापूरमधील व्यंकटेश पडळ यांनी या उपक्रमाची सुरूवात केली. ‘श्रेष्ठा बुक बँक’ या नावाने सुरू झालेला हा उपक्रम सध्या समाजमाध्यमांवर गाजतो आहे. पुण्यात या उपक्रमाला मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांची आदल्यावर्षीची शाळेची पुस्तके गोळा केली जातात. ज्या गरजू मुलांना पुस्तकाची गरज असेल, त्यांच्यापर्यंत ही पुस्तके पोहोचवली जातात. यासाठी पालकांनी किंवा संस्थांनी गरजू विद्यार्थ्यांची नोंदणी केली की त्यांना प्राधान्याने ही पुस्तके दिली जातील. मात्र मागणीपेक्षा अधिक पुस्तके जमा झाली तर शाळांकडून माहिती गोळा करून ही पुस्तके देण्यात येतात.

या उपक्रमात मराठी आणि इंग्रजी माध्यम दोन्हीची पुस्तके गोळा करण्यात येत आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांना अधिक मागणी असल्याचे पडळ यांनी सांगितले. मग मराठी माध्यमाच्या पुस्तकांचे काय होते? तर शाळेतील विद्यार्थ्यांना ही पुस्तके नको असल्यास ती स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या उपयोगी पडतात. समाज माध्यमे या उपक्रमासाठी आधार ठरली. समाजमाध्यमांवरील संदेशांच्या आधारे आता या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. पुण्याबरोबरच सोलापूर, नाशिक, मुंबई, ठाणे येथेही हा उपक्रम सुरू आहे.

या उपक्रमाबाबत पडळ यांनी सांगितले, ‘पाठय़पुस्तकांची रद्दी दरवर्षी होत असते. त्याचवेळी इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये पालकांचे पुस्तकावरून वाद होत असतात. यावर तोडगा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला. एवढा प्रतिसाद मिळेल असे सुरूवातीला वाटले नव्हते. मात्र समाजमाध्यमांवर संदेश पसरला आणि याबाबत विचारणा होऊ लागली. पुण्यातील कार्यकर्त्यांकडे आतापर्यंत पन्नास संच जमा झाले आहेत. आता परीक्षा संपल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर विचारणा होत आहे. काही संच वाटूनही झाले आहेत.’

पुस्तके देण्यासाठी किंवा मिळण्यासाठी संपर्क

  • सुरेश फुली- ९८२२३७७०८७
  • सचिन बत्तुल- ९४०४८३०२०४
  • अजय गज्जम- ९९२२५५७६२२
  • निखिल बोडके- ९१६८१२२४२४