मेट्रो प्रवासामध्ये सोमवारी चक्क एक पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रवाशांनीही यामध्ये सहभाग घेतला. जागतिक कविता दिनानिमित्त काव्यशिल्प पुणे या संस्थेतर्फे मेट्रो प्रवासामध्ये कविसंमेलन घेण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी पुस्तक प्रकाशन कार्यक्रम रंगला. गरवारे महाविद्यालय ते वनाज आणि परतीचा प्रवास अर्ध्या तासाचा असल्याने कार्यक्रम आटोपशीर झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


दिलीपराज प्रकाशनातर्फे संगणकतज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘आपले डिजिटल जीवन’ या पुस्तकाचे प्रकाशन मेट्रो प्रवासात नियोजित संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाशक राजीव बर्वे, मीना सासणे या वेळीउपस्थित होते.


मेट्रो मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही या वेगळ्या उपक्रमाचे स्वागत केले.


यावेळी संगणक तज्ज्ञ असलेल्या डॉ. दीपक शिकारपूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आपले डिजिटल जीवन हे वेगळ्या स्वरूपाचे माझे पुस्तक आज मेट्रो सफर करताना प्रकाशित झाले याचा विशेष आनंद आहे. येत्या काळात आपल्या जीवनात डिजिटल माध्यमामुळे जे बदल घडणार आहेत त्याची सविस्तर माहिती या पुस्तकात मी दिली आहे. त्याचे आणखी एक वेगळेपण म्हणजे प्रत्येक प्रकरणात क्यूआर कोड दिले आहेत. ते स्कॅन केल्यानंतर संबंधित विषयाचे व्हिडिओ तसेच अधिक माहितीही उपलब्ध होणार आहे मेट्रो ही आधुनिक जीवनशैली पुणेकरांनी अंगिकारली आहे. त्याला अनुषंगून या पुस्तकाचे प्रकाशन मेट्रो सफर करताना करण्यात आले”.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book publication programme organized in pune metro vsk