पुणे : पुण्यातील कोंढव्यामधील आयपीएलच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा घेणार्‍या बुकींवर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी रात्री छापा टाकला. याप्रकरणी नऊजणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून संगणक लॅपटॉप, मोबाईल संच, रोकड असा पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. एकाचवेळी सट्टा घेणार्‍या नऊजणांना अटक झाल्याने क्रिकेट बॅटिंग बाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाकडून सात हजार वाहनांवर कारवाईचा दंडुका; १७ हजार वाहनांची तपासणी, ११ हजार जणांचे समुपदेशन

हेही वाचा – मा. प. मंगुडकर यांचे निधन

हेमंत रविंद्र गांधी, अजिंक्य शामराव कोळेकर  सचिन सतीश घोडके, यशप्रताप मनोजकुमार सिंह, धर्मेंद्र संगमलाल यादव, रिगल चंद्रशेखर पटेल, अनुराग फुलचंद यादव, इंद्रजित गोपाल मुजुमदार आणि सतीश संतोष यादव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोंढव्यातील ब्रम्हा आंगण सोसायटीत एका सदनिकेत मोठ्या प्रमाणावर सट्टा घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार आणि वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली होती. त्यानंतर तेथे कारवाई करून नऊजणांना अटक करण्यात आली. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bookies taking bets on ipl cricket match in kondhwa in pune caught by police pune print news rbk 25 ssb